खंडेलवाल बहिण-भाऊ सायकलवरुन करणार नगर ते स्टॅच्यु ऑफ युनिटीचा प्रवास

Homeताज्या बातम्याअहमदनगर

खंडेलवाल बहिण-भाऊ सायकलवरुन करणार नगर ते स्टॅच्यु ऑफ युनिटीचा प्रवास

नगर - अखंड भारताचे लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या भुईकोट किल्ल्याच्या कारावसालाही 75 व

श्रीरामपुरात वाळू तस्करांकडून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
अमृतवाहिनी आयटीआयच्या 42 विद्यार्थ्यांची निवड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहमदनगरचं नातं | Ambedkar Jayant Special | LokNews24

नगर –

अखंड भारताचे लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या भुईकोट किल्ल्याच्या कारावसालाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अहमदनगरचे 75युवक ‘जमीन से आसमान तक’ या संकल्पनेद्वारे त्यांना मानवंदना देणार आहेत. दि. 11/11/2021 रोजी हे 75 युवक भुईकोट किल्ला येथून सायकलने प्रयाण करणार आहेत. तीन दिवसांत ते गुजराथ येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी या ठिकाणी 550 कि.मी.चा प्रवाह करुन पोहणार आहेत.

 यामध्ये नमन रितेश खंडेलवाल हा 14 वर्षाचा मुलगा व जया रितेश खंडेलवाल ही 16 वर्षाची मुलगी हेही या उपक्रमात सहभागी होत आहे. तेही हा टप्पा पूर्ण करणार आहेत. त्यांच्या या धाडसास अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे दोघे जे.के.सिरॅमिकचे संचालक जगदीश खंडेलवाल यांचे नातू आहेत.

COMMENTS