कोविडचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे – तहसीलदार उमेश पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोविडचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे – तहसीलदार उमेश पाटील

अहमदनगर प्रतिनिधी -  शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नागापूर येथील रेणुका माता देवस्थानच्या वतीने विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल

कळस बुद्रुक शाळेचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती यादीत चमकले
राजकीय पक्षांना आवश्यक परवानग्यासाठी सुविधा कक्ष
आमदार थोरात व आमदार डॉ.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भव्य अश्वारूढ पुतळा साकारणार – सोमेश्वर दिवटे

अहमदनगर प्रतिनिधी – 

शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नागापूर येथील रेणुका माता देवस्थानच्या वतीने विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज नगर तालुका तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली यावेळी तहसीलदार पाटील म्हणाले की,आपल्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट आल्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

यासाठी देवीचरणी कोरोनाचे संकट दूर होऊन नागरिकांचे जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी देवीच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली 

यावेळी याप्रसंगी यावेळी अध्यक्ष प्रभाकर भोर,खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त साहेबराव भोर,राजू भोर,दत्तात्रय विटेकर,गोरख कातोरे,विष्णू भोर,किरण सप्रे,कचरू भोर,सुखदेव सप्रे,किरण कतोरे,नगरसेवक राजेश कातोरे,अभिजित खोसे,भैया वाबळे,रोहन बारस्कार आदिसह देवस्थानचे विश्वस्त यावेळी उपस्थित होते.

COMMENTS