कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य ; जिल्हाधिकारी डॉ. भोसले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य ; जिल्हाधिकारी डॉ. भोसले

जिल्ह्याच्या काही भागात विशेषता ग्रामीण भागात अद्यापही कोरोना बाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार : डॉ. श्रीपाल सबनीस
अकोलेत डिझेलअभावी एसटीचे चाके थांबली
नगर-कल्याण रोडवर भव्य फटाका मार्केट सुरु

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या काही भागात विशेषता ग्रामीण भागात अद्यापही कोरोना बाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. ग्रामसुरक्षा दल आणि हिवरे बाजार पॅटर्न प्रमाणे गावात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी आता अधिक सक्रीय भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकार्‍यांनी अशा गावांना थेट भेटी देऊन पाहणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नुकताच तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. सध्या जरी रुग्णसंख्येत काहीशी घट दिसून येत असली तरी संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. अद्याप ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत, ही बाब गांभीर्यांने घेणे आवश्यक आहे. गावात बाहेरगावाहून आलेल्या आणि आजाराची लक्षणे असणार्‍या व्यक्तींची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गावात कार्यरत विविध पथकांनी सक्रीय भूमिका बजावणे गरजेचे आहे. कोरोनामुक्त गाव ठेवायचे असेल तर नियमांचे पालन करावे लागणार असल्याची बाब तालुकास्तरीय अधिकाऱी आणि ग्रामस्तरीय अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना पटवून द्यावी, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

लसीकरणाचे आवाहन

जिल्ह्यात आता लसीकरण मोहीम 18 ते 44 वयोगट तसेच 45 व त्यापुढील नागरिकांसाठी सुरु आहे. त्या-त्या ग्रामीण रुग्णालय अथवा लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. तेथील आरोग्य यंत्रणेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, जेणेकरुन अशा केंद्रावर गर्दी होणार नाही, असेही ते म्हणाले.

COMMENTS