कोरोना संक्रमणाचा वेग वाढला ; केरळने वाढवली चिंता

Homeताज्या बातम्यादेश

कोरोना संक्रमणाचा वेग वाढला ; केरळने वाढवली चिंता

नवी दिल्ली : देशभरात कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे चिंता वाढली आहे. देशात शुक्रवारी तब्बल 46 हजार 759 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या

नवीन शिक्षण धोरण, ज्ञाननिर्मितीस पूरक
दोन वर्ष गतीमान राहून ध्येयापर्यंत पोहचा ः कुलगुरू डॉ.काळकर
माझा जीव जाईल अशा पध्दतीचे त्यांचे कृत्य होते – खा. भावना गवळी

नवी दिल्ली : देशभरात कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यामुळे चिंता वाढली आहे. देशात शुक्रवारी तब्बल 46 हजार 759 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत तब्बल 509 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, देशातील कालच्या एका दिवसातील कोरोना संक्रमितांपैंकी तब्बल 32 हजार 801 कोविड रुग्ण केवळ केरळमधून समोर आले आहेत. तर केरळमध्ये काल 179 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे चिंता वाढली आहे.
तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत सरकारने उपाययोजना केल्या आहेत. लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. शुक्रवारी लसीकरणात 60 कोटींचा टप्पा गाठला. मात्र कोरोनावरील दोन लस घेतल्या असल्या तरी नागरिकांना नियम पाळण्याची विनंती केली जात आहे. त्याचबरोबर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. सध्या देशात 3 लाख 59 हजार 775 सक्रिय रुग्ण आहेत. करोनामुळे देशात आतापर्यंत 4 लाख 37 हजार 370 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 62 कोटी 29 लाख 89 हजार 134 जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासात 1 कोटी 3 लाख 35 हजार 290 जणांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. करोनावर मात करण्यासाठी आतापर्यंत देशात सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, झायकोव्ह-डी, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसीला परवानगी दिली आहे.

COMMENTS