जागतिक कोरोना साथरोग हे शतकातील सर्वात मोठे आव्हान म्हणून जगासमोर उभे ठाकलेय. परंतु, जेव्हा मानवतेवर मोठे संकट येते, तेव्हा विज्ञान मदतीला येते.
नवी दिल्ली : जागतिक कोरोना साथरोग हे शतकातील सर्वात मोठे आव्हान म्हणून जगासमोर उभे ठाकलेय. परंतु, जेव्हा मानवतेवर मोठे संकट येते, तेव्हा विज्ञान मदतीला येते. कोरोना साथरोगाच्या काळातही विज्ञानाने चांगल्या भविष्याचा मार्ग प्रशस्त केल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सीएसआयआर सोसायटीच्या बैठकीला संबोधीत करताना ते बोलत होते.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, मागील शतकाचा अनुभव असा आहे की यापूर्वी जेव्हा जगातील इतर देशांमध्ये कोणताही शोध लागत होता, तेव्हा भारताला त्यासाठी बरीच वर्षे थांबावे लागत होते. परंतु, आज आपल्या देशातील वैज्ञानिक त्याच वेगाने काम करत इतर देशांसोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. आमच्या वैज्ञानिकांनी अवघ्या एक वर्षाच्या आतच मेड इन इंडिया कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. आजघडीला भारत शाश्वत विकास आणि स्वच्छ उर्जा क्षेत्रात जगाला मार्ग दाखवित आहे. सॉफ्टवेअरपासून उपग्रहापर्यंत आपण अन्य देशांच्या विकासालाही वेग देत आहोत, जगाच्या विकासात भारत मुख्य इंजिनची भूमिका निभावत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. वर्तमानात भारताला शेतीपासून खगोलशास्त्र, लसीपासून वर्चुअल रियलिटी पर्यंत, बायोटेक्नॉलॉजीपासून बॅटरी तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक दिशेने स्वावलंबी आणि सक्षम बनण्याची इच्छा आहे. कोरोनामुळा हा वेग मंदावला आहे, मात्र स्वावलंबी भारत, सशक्त भारत हा आपला संकल्प असल्याचे मोदी यांनी सांगितले.
COMMENTS