सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज पालकमंत्री पाटील यांनी कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांवर विनाकारण फिरणार्यांवर कारवाई करा, अशा सूचना करुन पालकमंत्री पाटील म्हणाले, बाजार पेठांबरोबर सार्वजनिक ठिकाणी विना मास्क कोणी दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असे सांगून जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या, औषधे व रुग्णांना देण्यात येणार्या इतर सेवा सुविधांबाबत माहिती घेतली.
COMMENTS