कोरोना योद्धे  आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोरोना योद्धे आजच्या युगातील मनुष्य रूपातील देव : कारभारी आगवन

संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना सोबत दोन हात करणारे फ्रन्टलाइन वर्कर म्हणून कार्य करत असलेले आजच्या युगातील मनुष्यातील देवरूप असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी  उपाध्यक्ष कारभारी पाटील आगवन यांनी करंजी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांना सन्मान पत्र वाटप प्रसंगी व्यक्त केले.

राज्यात उष्माघाताचे चार बळी
दंत चिकित्सा शिबीराचा 51 रुग्नानी घेतला लाभ
राहाता नगरपालिका पाणी साठवण तलावात पाच टक्केच पाणीसाठा

कोपरगाव शहर प्रतिनिधी-  संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना सोबत दोन हात करणारे फ्रन्टलाइन वर्कर म्हणून कार्य करत असलेले आजच्या युगातील मनुष्यातील देवरूप असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी  उपाध्यक्ष कारभारी पाटील आगवन यांनी करंजी येथे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांना सन्मान पत्र वाटप प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोना महामारीने जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  करंजी गावात देखील कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले होते ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे करंजीचे ग्रामविकास अधिकारी ,आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सरपंच, उपसरपंच, वायरमन,पोलीस पाटील, पत्रकार, रेशनदुकानदार, ग्रामपंचायत कर्मचारी, डॉक्टर आदी फ्रन्टलाइन वर्कर म्हणून कार्य करणाऱ्याना आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या विमलताई कारभारी आगवण यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
 सदर कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे संचालक संजय आगवन, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना संचालक भास्कर भिंगारे, पंचायत समिती माजी उपसभापती नवनाथ  आगवन, सांडूभाई पठाण, डॉ सुनील देसाई, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना माजी संचालक चांगदेव आगवन , बाबासाहेब कापसे, अल्ताफ इनामदार, संतोष आगवन आदी मान्यवर उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक संजय आगवन यांनी तर आभार रयत लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था चे उपाध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी केले.
 यावेळी कारभारी आगवन यांनी बोलताना सांगितले की आमदार काळे यांनी कोरोना  काळात केलेले कार्य हे राज्यासाठी दिशादर्शक असून याची खुद्द खासदार शरद पवार साहेब यांनी दखल घेत पाठीवर हात ठेवून शाबासकी देत काळजी घेण्याचा देखील सल्ला दिला होता.

COMMENTS