कोरोना काळात आर्थिक संकट ओढवलेल्या महिलांना शिलाई मशीनचे वाटप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना काळात आर्थिक संकट ओढवलेल्या महिलांना शिलाई मशीनचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)-  कोरोना काळात आर्थिक संकट ओढवलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने र

Ahmednagar : मनसेच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी l Lok News24
साखर सम्राटांपुढे निलेश लंकेंचे लोकसभेला आवाहन l Nilesh lanke l LokNews24
वाळकी गटात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी : बाळासाहेब हराळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

कोरोना काळात आर्थिक संकट ओढवलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने शहरातील सहा गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी इंटिग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर, सचिव हेमंत लोहगावकर, माजी समाज कल्याण अधिकारी रफीक मुन्शी, निखिल कुलकर्णी, शंतनु खानवेलकर, नचिकेत रसाळ आदी रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

रोटरीचे अध्यक्ष सुयोग झंवर म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकट काळात अनेक घरातील कर्ता पुरुष गमावला गेला. टाळेबंदीत काहींच्या नोकर्‍या गेल्या, तर हातावर पोट असलेल्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. काही महिला संसाराचा गाढा पुढे चालविण्यासाठी सरसावल्या आहेत. या महिलांना पाठबळ देऊन, त्यांना त्यांच्या पायावर उभे करुन आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी रोटरी चा हाथ, सदैव साथ या ब्रीद वाक्याप्रमाणे हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेमंत लोहगावकर यांनी पती गमावलेल्या महिला घर चालविण्यासाठी शिवणकाम करणार आहेत. महिलांचे कपडे, कापडे पिशव्या, मास्क आदींचे शिवणकाम करुन त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यांनी बनवलेल्या साहित्याच्या विक्रीसाठी देखील रोटरी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सामाजिक प्रकल्पाला प्रायोजकत्व लाभलेले ब्राह्मण बिज़नेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष विनीत मुंगी यांनी यापुढेही रोटरीसह एकत्र येऊन सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी मोठे समाजकार्य उभे करण्याचा विश्‍वास व्यक्त केला.

COMMENTS