कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे सावट कायम; केरळात पाच दिवसात दीड लाख कोरोना रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे सावट कायम; केरळात पाच दिवसात दीड लाख कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट कमकुवत होत असतांना, केरळमधील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख चिंता वाढवणारा आहे. केरळमध्ये 5 दिवसांमध्ये तब्बल दी

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचे निधन
अवैध खनिज कारवाईत 22 लाख रूपयांचा दंड
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट कमकुवत होत असतांना, केरळमधील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख चिंता वाढवणारा आहे. केरळमध्ये 5 दिवसांमध्ये तब्बल दीड लाख कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे केरळमधील कोरोना रुग्णांची लाट रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
केरळ व्यतिरिक्त महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही कोरोनाची प्रकरणे अधिक येत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 45 हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये केवळ केरळमध्ये 31 हजार 265 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचा कालावधी केंद्राने 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. केंद्राने राज्यांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त दक्षता घेण्यास सांगितले आहे. गरज पडल्यास स्थानिक पातळीवरील निर्बंध लादण्याची लवचिकताही राज्यांना देण्यात आली आहे. केरळमध्ये, कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या सतत 30 हजारांपेक्षा जास्त आहे. याच्या एक दिवस आधी देशातील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या 46 हजार 783 होती. केरळमध्ये मात्र, राज्यातील चाचणी सकारात्मकता दर शुक्रवारी 19.22 टक्केच्या तुलनेत 18.67 टक्केवर आला. शनिवारी देशात व्हायरसमुळे 444 मृत्यू झाले. यामध्ये केरळमध्ये 153, महाराष्ट्रात 126, ओडिशामध्ये 68, तामिळनाडूमध्ये 21 आणि आंध्र प्रदेशमध्ये 19 मृत्यू झाले आहेत. देशातील कोरोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांपैकी (3.7 लाख) प्रकरणांपैकी 55 टक्के रुग्ण एकटे केरळचे आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. केरळमध्ये गेल्या पाच दिवसांपासून आणि ओनमनंतर संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
या दरम्यान, केरळमध्ये 1 लाख 49 हजार 814 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये सोमवारपासून रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत रात्रीचा कर्फ्यू जाहीर केला जाईल. रविवारी संपूर्ण लॉकडाऊन लागू केले जाईल. महाराष्ट्रात शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 4,831 नवीन प्रकरणे नोंदली गेली. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकार्‍याच्या मते, नवीन प्रकरणांची नोंद झाल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 64,52,273 झाली आहे. ईशान्येकडील मिझोरम राज्यात कोरोना संसर्गामध्ये थोडी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात 4 हजार 831 रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले 4 हजार 831 रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे 126 व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गाने मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 64 लाख 52 हजार 273 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत 1 लाख 37 हजार 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

COMMENTS