कोरोनाच्या आरोग्य संवादात माहिती व जनसंपर्कच्या नाशिक टीमचे कार्य कौतुकास्पद :  डॉ. दिलीप पांढरपट्टे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या आरोग्य संवादात माहिती व जनसंपर्कच्या नाशिक टीमचे कार्य कौतुकास्पद : डॉ. दिलीप पांढरपट्टे

नाशिक : कोरोनाच्या आरोग्य संवादात माहिती व जनसंपर्कच्या टीम नाशिकने कौतुकास्पद काम केले असून या काळात विविध प्रसार माध्यमांचा सुयोग्य वापर व पारंपरिक

प्रतिपिंडाचा प्रभाव कमी झाल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ
30 एप्रिलपर्यंत सरसकट संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय
बोगस वाहन नोंदणी प्रकरणी तीन आरटीओ अधिकार्‍यांसह 9 आरोपींना अटक
नाशिक : कोरोनाच्या आरोग्य संवादात माहिती व जनसंपर्कच्या टीम नाशिकने कौतुकास्पद काम केले असून या काळात विविध प्रसार माध्यमांचा सुयोग्य वापर व पारंपरिक माध्यमांच्या व्यवस्थापनातून व व्यापक जनजागृती करत आरोग्य संवादकाची भूमिका यशस्वीरित्या निभावल्याचे प्रतिपादन राज्याचे माहिती जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.
राज्याचे माहिती जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी नुकतीच नाशिक येथे जिल्हा माहिती कार्यालय व विभागीय माहिती कार्यालयास भेट दिली. त्यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य संवादक म्हणून काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करताना ते बोलत होते. यावेळेस नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत (नाशिक), विलास बोडके (धुळे) माहिती अधिकारी तथा सहाय्यक संचालक अर्चना देशमुख, मोहिनी राणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिव डॉ. पांढरपट्टे म्हणाले, आजच्या युगाचे वर्णन ‘बहुमाध्यमांचे युग’ म्हणून केला जातो. कोरोनामुळे या बहुमाध्यम संस्कृतीला डिजिटलायजेशनचे कोंदण लाभले आहे. येणाऱ्या काळात बहुमाध्यमांच्या डिजिटलायजेशनचा प्रभावदर्शक कालखंड म्हणून या कालखंडाकडे पाहिले जाईल. या बहुमाध्यमांची दृष्टी आणि भान असणारी व्यक्तीच आज माध्यम, जनसंपर्क वा संवाद क्षेत्रात यशस्वीपणे काम करू शकते. आजच्या कोरोना महामारीच्या तत्काळ संवादाच्या युगात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली बातमी लहानमोठ्या शहरांत लगोलग पसरते, पोहचते. त्यामुळे अत्यंत संवेदशीलतेने व जाणिवेने शासकीय जनसंपर्क अधिकारी कर्मचारी काम करत असल्याचेही यावेळी माहिती जनसंपर्क सचिव डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS