कोरेगावमध्ये बिबट्याने घेतला कुत्र्याचा बळी ; वासरू जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगावमध्ये बिबट्याने घेतला कुत्र्याचा बळी ; वासरू जखमी

कर्जत : प्रतिनिधीकर्जत तालुक्यातील कोरेगावमध्ये येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरावर आणि कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली

माजी नगरसेवक छिंदमविरोधात दोषारोप पत्र दाखल होणार
भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर ; 80 टक्के झाला साठा, मुळा व निळवंडे प्रतीक्षेत
सावित्रीआई म्हणजे मायेचा सागर होय ः विवेकजी मदन

कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील कोरेगावमध्ये येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बिबट्याने वासरावर आणि कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बिबट्याच्या भीतीने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
कोरेगावमधील बिभीषण मुरकुटे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. यात वासरू किरकोळ जखमी झाले आहे. त्यानंतर शिवाजी सूर्यभान घालमे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने कुत्र्याचा बळी घेतला. या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गावामध्ये ऊसाचे पीक जास्त असल्याने शेतकऱ्यांकडून शेतात जाणे टाळले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, वनरक्षक सुरेश भोसले व कर्मचाऱ्यांनी कोरेगावकडे धाव घेतली. याच अधिकाऱ्यांना वासरु हे किरकोळ जखमी झाल्याचे आढळून आले. हल्ला हा बिबट्याने केल्याचे दिसत असल्याने वनविभाग अधिक सतर्क झाला आहे.

COMMENTS