कोपरगाव शहर प्रतिनिधी- कमी - अधिक होणा-या विदयुत दाबामुळे गेल्या दोन महिन्यापासुन वीजपुरवठा विस्कळीत होत आहे, या गोंधळामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत असुन घरातील विविध विदयुत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे,
कोपरगाव शहर प्रतिनिधी- कमी – अधिक होणा-या विदयुत दाबामुळे गेल्या दोन महिन्यापासुन वीजपुरवठा विस्कळीत होत आहे, या गोंधळामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत असुन घरातील विविध विदयुत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे, त्यातच वीज विभागाच्या कार्यालयाकडुन विदयुत पुरवठा कट करण्याची मोहीम राबविली जात आहे. ही अन्यायकारक मोहिम थांबवुन वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी दिला आहे.
महाराप्ट्र राज्य विजवितरण कंपनीचे कोपरगाव अर्बनचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता यांना भारतीय जनता पार्टी,युवा मोर्चाच्या कोपरगाव शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विनोद राक्षे, निलेश बोऱ्हाडे, सतीश म्हस्के, निलेश पवार,शिनूशिंग भाटीया आदी उपस्तीत होते.निवेदनात पुढे म्हटले आहे की, सुमारे दोन महिन्यापासुन लाॅकडाउन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते, बाजारपेठ बंद असल्यामुळे अनेक कुटूंबांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असून हातावर पोट असलेल्या कुटूंबाची उपासमार होत आहे. सर्वच व्यवहार बंद असल्याने रोजच्या जगण्याची भ्रांत नागरीकांपुढे आहे. यापरिस्थीतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून वीजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सततच्या विस्कळीत वीजपुरवठयामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कमी-अधिक दाबाने होणा-या वीज पुरवठयामुळे अनेक कुटुंबाच्या घरातील विदयुत उपकरणे जळून जात असल्याने या कोरोना महामारीच्या संकटात आणखी आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वीज विभागाकडून थकीत बिलांची आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे घरातील जळालेली उपकरणे दुरूस्ती करावी की, वीजेची बीले भरावी अषी संभ्रमावस्था नागरीकांमध्ये झालेली आहे.
कोरोना महामारीबरोबरच सुमारे दोन महिन्यापासून नागरीक या संकटाचा सामना करीत आहे. वीज मंडळाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा, नागरीकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात,अन्यथा भारतीय जनता पार्टी,युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा शहराध्यक्ष श्री पाठक यांनी दिला आहे.
COMMENTS