कोपरगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून प्रभाग पाचमध्ये औषध फवारणी

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून प्रभाग पाचमध्ये औषध फवारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त 'माझा प्रभाग, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येत आहे.

राहत्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन
डॉ आंबेडकर जयंती निमित्त शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे – अँड.नितीन पोळ
नगर शहराची पाण्याची चिंता मिटणार… ५० लाख लिटरची नवीन टाकी होणार कार्यान्वित LokNews24

कोपरगाव शहर प्रतिनिधी- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग ५ मध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता.६) युवक काँग्रेसने  औषध फवारणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस हृषीकेश खैरनार यांनी दिली आहे.
कोविडची दुसरी लाट ओसरली असली तरी संकट अजून टळलेले नाहीये. यासाठी स्वच्छता ठेवणे व नियम पाळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आमदार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रभाग पाचमधील कापड बाजार, श्री गोकर्ण गणेश मंदिर येथून औषध फवारणीस सुरुवात केली. त्यानंतर ब्राह्मण गल्ली, जुने टपाल कार्यालय, जुनी मामलेदार कचेरी, भारत प्रेस रस्ता, जिजामाता उद्यान, श्री जब्रेश्वर मारुती मंदिर, श्री बिरोबा चौक, पांडे गल्ली, ढाकणे हॉस्पिटल आदी परिसरात करण्यात आली.
याकामी नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार, श्री धरमशेठ बगरेचा साई तपोभूमीचे विश्वस्त,  सुनील गंगुले, रमेश गवळी, नवाज कुरेशी, राहुल देवळालीकर, जावेद शेख, संदीप कपिले, शिवा लकारे, सागर लकारे, आकाश डागा, गणेश लकोर, अझरुद्दीन शेख, मुकुंद भुतडा, तुषार गलांडे, विकास बेंद्रे, विकी जोशी, आनंद जगताप, अभिषेक उदावंत यांसह स्थानिक नागरिक सुनील खैरनार, अनिल भावसार, जवाहर गुजराती, प्रवीण गंगवाल, डॉ.महेंद्र गुजराती, रतन मुंदडा, बाळासाहेब जंगम, सचिन खैरनार, प्रशांत खैरनार, पीयूष गंगवाल, अमित शाह, हर्षल गवळी आदी उपस्थित होते.

COMMENTS