कोपरगाव पीपल्स बँकेचे येवला शाखेचे नवीन सुसज्ज वास्तूत स्थलांतर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव पीपल्स बँकेचे येवला शाखेचे नवीन सुसज्ज वास्तूत स्थलांतर

नगर जिल्ह्यासह राज्यात अग्रगण्य असलेल्या कोपरगाव पीपल्स बँकेच्या शाखेचे नवीन सुसज्ज व वातानुकूलित शाखेत स्थलांतर बॅंकेचे ज्येष्ठ संचालक उद्योगपती कैलास चंद्र ठोळे यांच्या हस्ते करण्यात आले .या बँकेचे

गोदावरी दूध संघातील वाहन चालकांसाठी प्रशिक्षण
वांबोरी घाटात दोघांना मारहाण करून लुटले
Sangamner : जि प सदस्य सिताराम राऊत यांनी शासनाच्या निधीचा केला गैरवापर (Video)

कोपरगाव प्रतिनिधी : नगर जिल्ह्यासह राज्यात अग्रगण्य असलेल्या कोपरगाव पीपल्स बँकेच्या शाखेचे नवीन सुसज्ज व वातानुकूलित शाखेत स्थलांतर बॅंकेचे ज्येष्ठ संचालक उद्योगपती कैलास चंद्र ठोळे यांच्या हस्ते करण्यात आले .या बँकेचे कार्यक्षेत्र आठ जिल्ह्यां मध्ये असून सन 2001 पासून येवले शहरात या बँकेची शाखा आहे आता नवीन जागेत त्याचे स्थलांतर करण्यात आले आहे  कोरोना परिस्थितीचा विचार करता अत्यंत साध्या पद्धतीने शासनाचे नियमांचे पालन करून सदरचा स्थलांतर सोहळा पार पडला. 

    याप्रसंगी बोलताना कैलासचंद्र ठोळे म्हणाले बँकेची आर्थिक स्थिती संस्थेचे भाग भांडवल पाच कोटी 89 लाख एकूण ठेवी 263 कोटी 33 लाख कर्ज वितरण 134 कोटी 32 लाख एकूण गुंतवणूक 152 कोटी सात लाख तर बँकेस ढोबळ नफा 3 कोटी 57 लाख निव्वळ नफा 1 कोटी 55 लाख 40 हजार रुपये ग्रॉस एनपीए5.47 टक्के नेट एनपीए शून्य पॉईंट पंचवीस टक्के इतका आहे बँकेस सतत ऑडीट वर्ग मिळालेला आहे. तसेच सभासदांना 15 टक्के लाभांश यापूर्वी देण्यात आलेला आहे या वर्षीही चांगला  लाभांश देण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. बँकेचे अध्यक्ष अतुल काले म्हणाले सध्याच्या स्पर्धात्मक युगात बँकेने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्येही बँकेने चांगली वसुली करून ग्रॉस एनपीए कमी  राखण्यात यश मिळवले आहे .यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले बँकेचे उपाध्यक्षा सौ प्रतिभा शिलेदार संचालक सर्वश्री डॉक्टर विजय कोठारी सुनील कंगले धरमचंद बागरेचा कल्पेश शहा राजेंद्र शिंगी सुनील बंब सत्येन मुंदडा हेमंत बोरावके वसंतराव आव्हाड यशवंत आबनावे रवींद्र ठोळे जनरल मॅनेजर दीपक एकबोटे असिस्टंट जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड सीनियर अधिकारी विठ्ठल रोठे स्थानिक सल्लागार सुभाष चंद् छाजेड अनिल मंडलेचा रमेश चंद्र पटेल आदी उपस्थित होते शेवटी शाखाधिकारी राजेंद्र पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS