कोरोना वॅक्सिंग चे एकत्रित लसीकरण करून मिळावे तसेच शासनातर्फे जी पंधराशे रुपये मदत आलेली आहे
कोपरगाव : कोरोना वॅक्सिंग चे एकत्रित लसीकरण करून मिळावे तसेच शासनातर्फे जी पंधराशे रुपये मदत आलेली आहे ती मॅजिक व मिनीडोअर मालक व यांना मिळावी या मागणीचे निवेदन कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने मंगळवारी (२९जुन) रोजी सकाळी १२ वाजता तहसील कार्यालयात जाऊन अध्यक्ष कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले. निवेदनावर अध्यक्ष कैलास जाधव व उपाध्यक्ष राजेंद्र सालकर यांच्या सह्या आहेत. या निवेदनात रिक्षा संघटनेच्या सर्व सभासदांचे कोरोना वॅक्सिंग चे एकत्रित लसीकरण करून मिळावे तसेच शासनातर्फे जी पंधराशे रुपये मदत आलेली आहे ती अजून सर्व रिक्षा चालकांना मिळाली नाही. या अनुदानात मॅजिक रिक्षा व मिनीडोर चालक-मालक यांचा समावेश करावा आम्ही सर्वजण दरसाल शासनाला अंदाजे ३०हजार रुपये कर अदा करीत असतो, परंतु कोरोना संकटामुळे सर्वकाही ठप्प झाले असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे इतर राज्यांमध्ये दादा हजार रुपये अनुदान दिले आहे परंतु महाराष्ट्र शासनाने पंधराशे रुपये अनुदान दिले आहे त्याबद्दल त्यांचे स्वागतच व आभार परंतु ज्या अनुदानापासून मॅजिक व मिनीडोर चालक-मालक वंचित राहिले आहे यांचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी टॅक्सी सेना अध्यक्ष असलम शेख प्रकाश शेळके आदी सह पदाधिकारी व रिक्षा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
COMMENTS