कोपरगावला वटसावित्री पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगावला वटसावित्री पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

कोपरगावमधील  प्रभाग क्र. २ मधील निवारा सुभद्रानगर, रिद्धीसिद्धी नगर, साई सिटीसह आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी कोरोना महामारीच्या भयंकर संकटानंतर वट पौर्णिमेचे दिवशी एकत्र येत आनंदाने आणि उत्साहवर्धक वातावरणात वट सावित्री पौर्णिमा साजरी केली. 

शेवगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
ठिबक सिंचनासाठी कर्जत तालुक्याला राज्यात सर्वाधिक आर्थिक लक्षांक- आ.रोहित पवार
महानगरपालिकेच्या कार्यालयात भरवले खड्ड्यांचे प्रदर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगावमधील  प्रभाग क्र. २ मधील निवारा सुभद्रानगर, रिद्धीसिद्धी नगर, साई सिटीसह आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी कोरोना महामारीच्या भयंकर संकटानंतर वट पौर्णिमेचे दिवशी एकत्र येत आनंदाने आणि उत्साहवर्धक वातावरणात वट सावित्री पौर्णिमा साजरी केली. 
प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनिताई कोयटे साई निवारा महिला मंडळाच्या अध्यक्षा  सौ.नंदिनी कदम, मंडळाच्या सदस्य सौ.वैशालीताई जाधव, सौ.दीपिका कुलकर्णी, जीजाताई कापे, सौ.मेघनाताई जवळे, सौ.मीनाताई जाधव, सौ.शोभा कदम, सौ.सरोदेताई, आदिंसह प्रभागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
वट सावित्री पौर्णिमे विषयीचे ऐतिहासिक महत्व सांगताना कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनिताई कोयटे म्हणाल्या कि, ‘माता सावित्रीने यमदेवाकडे सत्यवानाचे प्राण याच दिवशी वडाचे झाडाखाली पुन्हा मिळविले. त्या दिवशी पोर्णिमा होती, त्या दिवसापासून सुहासिनी महिला पौर्णिमेचे दिवशी पतीच्या प्राणाचे रक्षण व्हावे आणि पतीला सत्यवाना प्रमाणे दीर्घायुष्य लाभावे यासाठी व्रत करत असतात.’
तर साई निवारा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ.नंदिनी जनार्दन कदम वट वृक्षाचा वैज्ञानिक दृष्टीकोन स्पष्ट करताना म्हणाल्या कि,एक पूर्ण वाढलेले  वट वृक्षाचे झाड एका तासाला ७१२ किलो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन सोडत असतात, त्यामुळे वडाच्या झाडाखाली जास्तीत जास्त वेळ व्यतीत करून प्राणवायु घ्यावा

COMMENTS