कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयासाठी  एच.आर.सीटी. मशिन उपलब्ध करुन द्यावे : कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयासाठी एच.आर.सीटी. मशिन उपलब्ध करुन द्यावे : कोल्हे

सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन लढत आहे मात्र पुरेशा साधनसामुग्री अभावी रूग्णांना सेवा देण्यात अडथळे येत आहेत.

समताचे कामकाज राष्ट्रीयकृत बँकापेक्षाही सरस ः काका कोयटे
स्पर्धा परीक्षांसाठी युवकांनी सक्षम व्हावे -विकास सावंत
मुख्याधिकारी यांच्या नावाने लाच मागणारा लिपिक लाचलचुपतच्या जाळयात

कोपरगांव शहर  प्रतिनिधी:- सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन लढत आहे मात्र पुरेशा साधनसामुग्री अभावी रूग्णांना सेवा देण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. ही रूग्णवाढ रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना कराव्यात तसेच कोपरगांव ग्रामीण रुग्णालयसाठी एच.आर.सी.टी. स्कॕ मशिन  तातडीने उपलब्ध करुन देणे बाबतचे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना त्वरीत आदेश द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव माजी आमदार सौ. सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी केली आहे.  

कोपरगांव येथे दिनांक १७ एप्रिल २०२१ रोजी जिल्हयाचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड १९ आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीत कोपरगाव तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या चिंताजनक आहे. संसर्ग झालेल्या रूग्णांना पुरेशी वैद्यकीय  

सेवा मिळत नसल्यामुळे रूग्णांचे हाल होत असुन नातेवाईकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या वतीने ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आाहे, कोपरगांव येथे खासगी ठिकाणी एकच एच.आर.सीटी स्कॕन मशीन असल्याने तालुक्यातील विविध गावांतुन नागरिक तपासणीसाठी येत असतात यासाठी बरेच वेळ जात असल्याने अनेक रुग्णांना व त्यांच्या सेाबत आलेल्या नातेवाईकांची देखील मोठी तारेवरची कसरत होत असल्याने कोपरगांवच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एच.आर.सी.टी स्कॕन मशीन उपलब्ध करुन दिल्यास निश्चितच नागरीकांच्या सोयीसाठी होईल अशी मागणी सदर आढावा बैठकीत केल्यानंतर जिल्हयाचे पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांनी मागणीला हिरवा कंदीला दाखवून मागणीची दखल घेतली परंतु आजची कोपरगांवची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने एच.आर.सी.टी. मशिन गरजेचे आहेत यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना एच.आर.सी.टी. मषिन उपलब्ध होणे बाबत आदेश व्हावेत अशी विनंती देखील सौ. कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS