कोतवालीचे पोलिस करणार आता बोठेची सखोल चौकशी ; नगरच्या विनयभंग गुन्ह्यात झाला वर्ग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतवालीचे पोलिस करणार आता बोठेची सखोल चौकशी ; नगरच्या विनयभंग गुन्ह्यात झाला वर्ग

दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याच्याविरोधात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असल्यानेे कोतवाली पोलिसांनी गुरुवारी बोठेला ताब्यात घेतले.

राज्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे ! :आमदार थोरात यांचे श्री गणेशाला साकडे
कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ६० लाखांची रोकड केली हस्तगत
एकतर्फी प्रेमातून मुलीला ठेवले डांबून ; नगरच्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी- दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याच्याविरोधात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असल्यानेे कोतवाली पोलिसांनी गुरुवारी बोठेला ताब्यात घेतले. कोतवालीत दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आता बोठेची सखोल चौकशी केली जाणार आहे. विनयभंगासह बोठे याच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात इतरही गुन्हे दाखल आहेत. मात्र, सुरुवातीस विनयभंगप्रकरणी त्यास ताब्यात घेण्यात आले असल्याचे कोतवालीचे पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी सांगितले. 

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येनंतर बोठे हा हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर बोठे फरार झाला. त्याच वेळी नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात बोठे याच्याविरोधात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. बोठे फरार असल्यामुळे कोतवाली पोलिसांनाही बोठे हवा होता. बोठे याची पारनेरच्या प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी गुरुवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यास न्यायालयीन कोठडी मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राकेश मानगांवकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या महिलेच्या विनयभंगाप्रकरणी बोठे याचा ताबा देण्याची मागणी केली. न्यायालयाने कोतवाली पोलिसांचा अर्ज मंजुर करून बोठे यास कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

त्यात मिळाली न्यायालयीन कोठडी

हैद्राबाद येथून बोठे यास अटक करण्यात आल्यानंतर 14 मार्च रोजी त्यास पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी प्रथम वर्ग न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी बोठेला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर अनुक्रमे चार व दोन दिवसांची पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली. गुरुवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने बोठे यास पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या गुन्ह्यात आणखी एक दिवस पोलिस कोठडी मागणी पोलिस क़रू शकत होते. पण पोलिसांनी बोठेस पोलिस कोठडी न मागता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार बोेठे यास पारनेरच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

स्वतंत्र दोषारोप पत्र होणार

तेरा दिवसांच्या पोलिस कोठडीत बोठे याने दिलेल्या माहितीच्या आधारे येत्या अडीच महिन्यात पुरावे संकलित करण्यात येणार असून त्यानंतर बोठे याच्याविरोधात पारनेर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार आहे. बोठे याचा आयपॅड व अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल याचे पासवर्ड त्याने पोलिसांना सांगितलेले नाहीत. ते आठवत नसल्याचे तो सांगत आहे. त्यामुळे आता आयपॅड तसेच मोबाईल शुक्रवारी मुंबईतील फॉरेन्सिक लॅबमध्ये लॉक उघडण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी व उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले.

COMMENTS