केशकर्तनालय दुकानदारांना राज्यशासनाने आर्थिक मदत  करावी : कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

केशकर्तनालय दुकानदारांना राज्यशासनाने आर्थिक मदत करावी : कोल्हे

कोपरगाव शहर प्रतिनिधी-केशकर्तनालय व्यावसायिकांना दुकानदारीशिवायवाय पर्याय नसून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर सुरू आहे.

कारखाने विक्री घोटाळ्याची ईडी-सीबीआय चौकशी करा ; शेतकरी कामगार महासंघाची सहकार परिषदेत मागणी
बेट भागातील गटारी दुरुस्त करण्याची मागणी
महापुरुषांचे पुतळे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी- अशोक गायकवाड

कोपरगाव शहर प्रतिनिधी-केशकर्तनालय व्यावसायिकांना दुकानदारीशिवायवाय पर्याय नसून त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर सुरू आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे या व्यावसायिकांचे दुकान बंद करण्याचा शासनाने निर्णय घेेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून नाभिक बांधवांना कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या  प्रदेश सचिव , माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे केली आहे.
राज्यातील वाढती रूग्णसंख्या पहाता राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी लाॅकडाउनची घोषणा केली परंतु केवळ काही घटकांचाच विचार केला असून बहुतांशी घटक विचारात घेतलेले नाही, त्यामध्ये बारा बलुतेदार,छोटे व्यावसायिक फुलवाले तसेच केशकर्तनालय यांचेसाठी कोणतीच योजना नाही, वास्तविक नाभिक समाज हा स्वयंरोजगारातील सर्वात मोठा घटक आहे. मोठया प्रमाणात असलेल्या या घटकाचा राज्यशासनाने विचार करण्याची गरज होती, त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे या समाजामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.गेल्या लाॅकडाउन मध्ये मोठया आर्थीक समस्यांचा सामना करत आर्थीक घडी बसविण्यासाठी कष्ट उपसाणा-या या बांधवावर पुन्हा संकट कोसळले आहे. दुकानांसाठी भाडेकरारावर घेतलेले गाळे, दुकाने यांचे भाडे थकलेले असुन मागील लाॅकडाउन काळात थकलेली बील भरण्याची परिस्थितीही राहीली नसल्याने व्यावसायिक सैरभैर झालेले आहे. पुन्हा हेच संकट उभे राहिल्याने नागरीकांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे, त्याकरीता शासनाने  केशकर्तनालय दुकानदारांना मदत करावी, अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली.

COMMENTS