केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे नवे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या पुढाकारातून हे केंद्र सुरू झाले असून, यामुळे मराठा नगर, एकनाथ नगर, वैष्णव नगर, उदयनराजे नगर, शिवाजीनगर या भागातील नागरिकांच्या लसीकरणाची सोय यातून झाली आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी- केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे नवे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या पुढाकारातून हे केंद्र सुरू झाले असून, यामुळे मराठा नगर, एकनाथ नगर, वैष्णव नगर, उदयनराजे नगर, शिवाजीनगर या भागातील नागरिकांच्या लसीकरणाची सोय यातून झाली आहे.
केडगाव येथील आरोग्य केंद्र हे फक्त एकच लसीकरण केंद्र असल्याने या ठिकाणी केडगाव भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवून गर्दी कमी करण्यासाठी सातपुते यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून या लसीकरण केंद्राचे उदघाटन माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना लस देऊन लसीकरण सुरू करण्यात आले. यावेळी कोतकर व सातपुते यांच्यासह सागर सातपुते, बापू सातपुते, भूषण गुंड, योगेश कुमठेकर,राष्ट्रवादी विद्यार्थीचे उपाध्यक्ष विशाल सकट, विशाल सकट, अविनाश औटी, ऋषिकेश नेटके, दीपक आगरकर, मयूर जगदाळे, सोनू धेबुड, सुरेश चौधरी उपस्थित होते.
COMMENTS