केंद्रीय पथकाकडून सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा ; प्रशासनास महत्वपूर्ण सूचनांचा डोस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय पथकाकडून सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा ; प्रशासनास महत्वपूर्ण सूचनांचा डोस

केंद्रीय पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला सुचनांच्या काही मात्रांचा डोस दिला.

जावळी तालुक्यात रब्बीच्या पेरणीस बैलजोडीला ट्रॅक्टरचा पर्याय
जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर
आदित्य ठाकरेंची सुरक्षा वाढवली

सातारा / प्रतिनिधी : केंद्रीय पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला सुचनांच्या काही मात्रांचा डोस दिला. या केंद्रीय पथकामध्ये डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन हे होते.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये उपस्थित होते.

सातारा येथील जम्बो कोविड हॉस्पीटलमध्ये व्हेंटेलेटरीची संख्या वाढवावी. तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बेडच्या उपलब्धतेची माहिती जनतेला व्हावी, यासाठी प्रत्येक कोविड हॉस्पीटलच्या बाहेर बेड उपलब्धतेची माहिती रोजच्या रोज अपडेट करावी. जो भाग कटेन्मेंट जाहीर केला आहे, अशा भागात केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रभावी अमंलबजावणी करावी. कोरोना संसर्ग रुग्णाच्या जे-जे संपर्कात आले आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांची तातडीने कोरोना टेस्टींग करावे, यासह अनेक महत्वाच्या सुचनांचा डोस केंद्रीय पथकातील डॉ. गिरीष व डॉ. प्रितम महाजन यांनी बैठकीत दिला.

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सुविधा वाढण्यावर भर देत असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

COMMENTS