कुमार जगताप यांना जीवे मारण्याची धमकी ; कुळधरणमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुमार जगताप यांना जीवे मारण्याची धमकी ; कुळधरणमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेचे मुख्य संघटक कुमार जगताप यांना दमदाटी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त

विजेच्या शाॅकने बाळगीत कंत्राटी वायरमनचा मृत्यू l Lok News24
अतिवृष्टीनंतर पाथर्डीकराचे पाण्यावाचून दैना;सोमवार मंगळवारपर्यत प्रतीक्षा करावी लागेल;- नगराध्यक्ष गर्जे यांची माहिती
अहमदनगर : पत्रकार कुटुंबीयांचा दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेचे मुख्य संघटक कुमार जगताप यांना दमदाटी, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे वन्यजीव विभागाच्या रेहेकुरी काळवीट अभयारण्य कार्यक्षेत्रातील कुळधरण भागातील जंगलात गुरे चारल्याची माहिती दिल्याचा संशय मनात धरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

या प्रकरणी बाळू हरीभाऊ सुपेकर, चांगदेव तुकाराम सुपेकर, भाऊ शहाजी सुपेकर यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुमार जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे, मी शनिवार, दि.९ ऑक्टोबर रोजी कुळधरण येथील जगदंबा देवीच्या मंदिरासमोर असताना बाळू सुपेकर, चांगदेव सुपेकर, भाऊसाहेब सुपेकर या तिघा आरोपींनी आम्ही फॉरेस्टमध्ये गुरे चारतो, या बातम्या फॉरेस्ट खात्याला देतो, 

याचा संशय मनात धरून मला शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस भाऊसाहेब यमगर करीत आहेत. आरोपींचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हटले आहे.

COMMENTS