कुंभमेळ्याहून मुंबईत परतणार्‍यांना क्वारंटाइन करणार : पेडणेकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंभमेळ्याहून मुंबईत परतणार्‍यांना क्वारंटाइन करणार : पेडणेकर

कोरोनाची गंभीर स्थिती असतानाही हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी हजेरी लावली असून, कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

प्रत्येक गावात बजरंग दलाची शाखा स्थापन करणार-शंकर नाईनवाड
लॉकडाऊनमुळे संगमनेरची बाजारपेठ ठप्प !!
’अनलॉक’नंतर बाजारात पसरले नवचैतन्य

मुंबई/प्रतिनिधी: कोरोनाची गंभीर स्थिती असतानाही हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी हजेरी लावली असून, कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्याहून मुंबईत परतणार्‍या भाविकांना क्वारंटाइन केले जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली. 

राज्यासह मुंबईतही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा साठाही अपुरा असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कुंभमेळ्यातून भाविक मुंबईत परत आल्यावर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पेडणेकर यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. कुंभमेळ्याहून परतणारे भाविक ’प्रसाद’ म्हणून कोरोना घेऊन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांनी आपापल्या राज्यात स्वखर्चाने क्वारंटाईन व्हावे; मात्र जे भाविक मुंबईत परततील, त्यांना क्वारंटाइन करण्याचा विचार आम्ही करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. जवळपास 95 टक्के मुंबईकर कोरोना नियमांचे पालन करत आहेत; मात्र पाच टक्के नागरिक नियमांचे उल्लंघन करतात. या लोकांमुळे इतर लोकांनाही त्रास होण्याची शक्यता असते. सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण टाळेबंदी हाच प्रभावी उपाय ठरू शकतो, असे पेडणेकर यांनी या वेळी नमूद केले. 

COMMENTS