कुंभमेळ्यातून आलेल्यांचीही  क्लिप घंटागाडीवर लावावी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंभमेळ्यातून आलेल्यांचीही क्लिप घंटागाडीवर लावावी

कुंभमेळ्यातून नगर शहरात येणार्‍या भाविकांना 14 दिवस क्वॉरंन्टाईन करावे तसेच या भाविकांचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या घंटा गाडीवर ऑडीयो क्लिप लावण्याची मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

डॉक्टर म्हणून आला आणि पैशांचा गंडा घालून गेला
वीर जीवाजी महाले यांचे गुण स्वत:मध्ये आत्मसात करणे काळाची गरज – योगेश पिंपळे
Parner : पारनेरला तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार? : लोकायुक्तांकडे तक्रार l LokNews24

अहमनदगर/प्रतिनिधी- कुंभमेळ्यातून नगर शहरात येणार्‍या भाविकांना 14 दिवस क्वॉरंन्टाईन करावे तसेच या भाविकांचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या घंटा गाडीवर ऑडीयो क्लिप लावण्याची मागणी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट सक्रीय होत असताना हरिद्वार येथे घेण्यात आलेल्या कुंभमेळ्यातून कोरोना संक्रमणाचा भडका उडाला असल्याचे समोर आले आहे, असे राजे यांनी या निवेदनात नमूद करून पुढे म्हटले आहे की, कुंभमेळ्यामध्ये अनेक आखाड्यांचे साधू कोरोनाबाधित झाले असून, त्याचा शिरकाव तेथे गेलेल्या भाविकांमध्ये झाला आहे. महाराष्ट्रासह जिल्ह्याची गंभीर परिस्थिती पाहता कुंभमेळ्यातून येणार्‍या भाविकांना 14 दिवस क्वॉरंन्टाईन करण्याची गरज आहे तसेट कुंभमेळ्यातून आलेल्या भाविकांचा शोध घेण्यासाठी व नागरिकांमध्ये याबाबत जागृती करण्यासाठी महापालिकेच्या घंटागाडीच्या ध्वनिक्षेपकावर ऑडियो क्लिप लावण्याचीही मागणी आत करण्यात आली आहे. हरिद्वारच्या कुंभमेळ्यात महाराष्ट्रासह जिल्ह्यातील अनेक साधू व भाविक देखील गेलेले आहे. कोरोनामुळे या कुंभमेळ्याची समाप्ती झाली असून, अनेक भाविक परतीच्या प्रवासावर आहे. या कुंभमेळ्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने झाले असून, यामध्ये अनेक भाविक बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये कोरोनाची दुसरी लाट अजून गंभीर होऊ नये म्हणून महापालिकेने दक्षता घेण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS