कालीचरणवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्या

कालीचरणवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

रायपूर : काही दिवसांपूर्वी आयोजित धर्म संसदेत महात्मा गांधींच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण याला गुरुवारी पहाटे मध्यप्रदेशातील खजुराहो

राहता बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद
मिरवणुकीदरम्यान 11 जणांचा मृत्यू , दोन चिमुकल्यांचा समावेश |
पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट

रायपूर : काही दिवसांपूर्वी आयोजित धर्म संसदेत महात्मा गांधींच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण याला गुरुवारी पहाटे मध्यप्रदेशातील खजुराहो येथून अटक करण्यात आलीय.
त्यांच्या विरोधात काँग्रेसशासित छत्तीसगड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रायपूर पोलिसांना त्यांना खजुराहो येथून अटक केली. काही दिवसांपूर्वी धर्म संसदेत कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांचे मारेकरी नाथूराम गोडसे यांना नमस्कार करतो असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला गेला होता. देशातील वेगवेळ्या राज्यांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेवादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या कालीचरण यांना रायपुर पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका संघटनेने आयोजित केलेल्या धर्म संसदेत धर्मगुरू कालीचरण महाराज याने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणार्‍या नथुराम गोडसेंचं समर्थन केलं होतं. कालीचरणवर भारतीय दंड संहितेच्या कलम 505 (2) आणि 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यात देशद्रोहाच्या कलमाचा देखील समावेश करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून देखील कालीचरणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या दुसर्‍या एका प्रकऱणात कालीचरणवर गुन्हा दाखल केला आहे. कालीचरण आणि मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

COMMENTS