कारवाई करताना उपस्थित असलेला दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र… मलिकांचा दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारवाई करताना उपस्थित असलेला दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया वानखेडेंचा मित्र… मलिकांचा दावा

प्रतिनिधी : मुंबई नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे वाद आता आणखीनच टोकाला गेला आहे. कारवाई झालेल्या कॉर्डेलिया क्रुझवर दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज

समीर वानखेडे दिल्लीत मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या भेटीला (Video)
समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा
समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव

प्रतिनिधी : मुंबई

नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे वाद आता आणखीनच टोकाला गेला आहे. कारवाई झालेल्या कॉर्डेलिया क्रुझवर दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया हजर होता 

आणि हा माफिया समीर वानखेेडेंचा दाढीवाला मित्र असल्याचा दावा आज मलिकांनी केला. समीर वानखेडेंनी त्या मित्राचं नाव जाहीर करावं नाहीतर मी करेन, 

असा इशाराही नवाब मलिकांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले की, क्रुझवरील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा सगळं सत्य समोर येईल.

त्या क्रुझ पार्टीत सीसीटीव्ही फुटेज मागवावं. त्याची प्रेमिका बंदुकीसह क्रूझवर हजर होती. एका व्हिडीओत ती डान्स करताना दिसून येत आहे. 

क्रूझवरील पार्टीचं सीसीटीव्ही समोर आणा, सगळं सत्य समोर येईल, असं ते म्हणाले. क्रूझवर रेड झालीच नाही, त्या अगोदरच सगळी कारवाई झाली आणि हे लवकरच सगळ्यांसमोर उघड होणार असल्याचे मलिक म्हणाले आहेत. 

तर समीर वानखेडे, वानखेडेंचे चालक आणि प्रभाकर साईल यांचा सीडीआर तपासावा. त्यांच्या सीडीआरमधून सगळा घटनाक्रम समोर येईल, अशी मागणी नवाब मलिक एनसीबीकडे केली.. 

हे सगळे आरोप खुप गंभीर आहेत. एनसीबीने तात्काळ पावले उचलावीत. पुर्वीही मलिकांनी वानखेडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत.

COMMENTS