कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख

श्रीगोंदा प्रतिनिधी : कायदा हा सर्वांसाठी समान आहे .कायद्याचे उल्लंघन होता कामा नये ,कायद्याने सर्वांनाच मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याचे पालन करण्य

वीजचोरी प्रकरणी दोन वर्षाचा तुरुंगवास; अहमदनगर न्यायालयाचा निकाल
सिव्हील जळीतकांडाचा अहवाल तयार…हलगर्जीपणाचा ठपका?
वित्त आयोग निधी अपहारप्रकरणी सरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदा प्रतिनिधी :

कायदा हा सर्वांसाठी समान आहे .कायद्याचे उल्लंघन होता कामा नये ,कायद्याने सर्वांनाच मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याचे पालन करण्याची कायद्यानुसार सर्वांची जबाबदारी असल्याचे  प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश-1 व अति सत्र न्यायाधीश श्रीगोंदा यांनी व्यक्त केले आहे.

  “आजादी का अमृत महोत्सव “अंतर्गत जोशी वस्ती लिंपणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  श्रीगोंदा तालुका विधी सेवा समिती वकील संघाचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख हे होते.

याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना न्या शेख पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना वंचित घटकांना कायद्याचे योग्य मार्गदर्शन करून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या कायदेविषयक शिबीर मार्फत राबवले जात आहे .विशेष करून विविध जाती-धर्माच्या पालकांनी आपल्या मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, शिक्षण आहे तर माणूस ज्ञान आहे. त्यामध्ये अनेक पालक मुलामुलींची अल्पवयीन कालावधीतच लग्न करतात हे योग्य नाही. मुले मुली ही सज्ञान व ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय विवाहाच्या बंधनात आपल्या मुला-मुलींना अडकू नये. प्रत्येकाने अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे. असे सांगून ते पुढे म्हणाले की, कुटुंबामध्ये आई वडिलांना त्यांचा हक्क द्या, आई म्हणजे सर्व विश्व आहे. त्यांना वृद्धापकाळात अंतर देऊ नका.  प्रत्येकाने शासनाने मोफत उपलब्ध करून दिलेल्या कोरोना मुक्त होण्यासाठी लसीकरणाचा लाभ घेऊन, 100% लसीकरण करून घ्यावे कायदेविषयक भरीव असे मार्गदर्शन करत उपस्थितांना योग्य सल्ला देखील न्या शेख यांनी यावेळी दिला.

  याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एन. जी. शुक्ल यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्र बहिष्काराचा अधिनियम कायदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक फायद्याचे कायदे निर्माण केले. विविध जाती धर्मासाठी डॉ आंबेडकर यांनी प्रत्येकाला कायद्यानुसार न्याय मिळावा यासाठी तरतूद केली. प्रत्येकाला जगण्याचा मूलभूत महत्त्वपूर्ण अधिकार कायद्यानुसार दिलेला आहे. तेव्हा कायद्यापुढे सर्व समान आहोत त्याची जाणीव असायला हवी, जातपंचायतीकडून वंचित व अशिक्षित समाजाच्या भल्यासाठी व अन्याय न होता न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवायला हवे असे सांगून जात पंचायत व बहिष्कार बाबतचे कायदे  विषयी न्या. शुक्ल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी  दिवाणी न्यायाधीश एस एस शिंदे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, एखाद्या वंचित कुटुंबातील व्यक्तींना उत्पन्नाचे साधन नसते त्यावेळी मात्र आपली लहान लहान मुले कारखाने, टपरी, हॉटेल व विविध व्यवसायाच्या ठिकाणी बालमजुरी करायला भाग पडतात त्यातून त्यांच्या आरोग्याचा व भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. या बालमजुरी मुळे अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहतात. बालमजुरी करण्यास भाग पाडणे  हा कायद्यानुसार गुन्हा आहे .या बालमजुरी बालकांना अहोरात्र कष्ट करून घेताना त्या व्यक्तीवर दहा ते वीस हजार रुपये शिक्षेची तरतूद आहे. मुले ही देवाघरची फुले असून, दीड कोटी मुले ही बालमजुरी करतात. असे निदर्शनास आले आहे. पालकांनी आपले मुले सज्ञान होईपर्यंत बालमजुरी वर पाठवू नये. असा सल्ला देत बाल मजुरी बाबतचे कायदे याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. 

      याप्रसंगी अॅड महेश लगड यांनी जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन बाबतचे कायदे याविषयी मार्गदर्शन केले. अॅड. आनंद भोसले यावेळी म्हणाले की, स्रीयांना सक्षमपणे शिक्षण देण्याची गरज आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षणाने ज्ञान प्राप्त होते. मात्र भटक्या व इतर समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण हे अत्यल्प असल्याचे दिसून येते. ही चिंतेची बाब असल्याचे श्री भोसले यांनी सांगितले.

 यावेळी अॅड विश्वास नागवडे, अॅड विजया घोडके, अॅड संदीप भोईटे, गावचे सरपंच शुभांगीताई जंगले, उपसरपंच अरविंद कुरुमकर, सदस्य संतोष चव्हाण, फुलचंद सावंत, डॉ दत्तात्रेय गायकवाड, निळकंठ जंगले, भरत रंधवे, विपुल रोडे, गंगा मलले, ग्रामसेवक श्री माने आदींसह विविध जाती धर्माचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

   प्रास्ताविक अॅड एस एच कापसे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड अशोकराव रोडे यांनी केले. तर आभार अॅड. जयंत शिंदे यांनी मानले.

COMMENTS