कामगार आयुक्त कार्यालयासमोर महिलांनी घासली व धुतली भांडी ; क्रांती असंघटित कामगार संघटनेचे आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामगार आयुक्त कार्यालयासमोर महिलांनी घासली व धुतली भांडी ; क्रांती असंघटित कामगार संघटनेचे आंदोलन

स्टेशन रस्त्यावरील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर महिलांनी सोमवारी भांडी घासून ती धुण्याचे अभिनव आंदोलन केले.

जागतिक फार्मासिस्ट दिन व कोरोना योध्दा सत्कार समारंभ जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न
अकोले तालुक्यात स्टार्टअप यात्रा उत्साहात
सहा वाहनांचा भीषण अपघात, 4 ठार, 8 जण जखमी | LOKNews24

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्टेशन रस्त्यावरील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर महिलांनी सोमवारी भांडी घासून ती धुण्याचे अभिनव आंदोलन केले. राज्य सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपयाचे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे व अनुदान मिळण्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून होण्याच्या मागणीसाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्यावतीने हे भांडी घासा आंदोलन करण्यात आले.

तील शहरी व ग्रामीण भागातील सुमारे चार ते साडेचार हजार घरेलू कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेली आहे. राज्य सरकारने 30 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या घरेलू कामगारांना (मोलकरीण) दीड हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केलेली आहे. टाळेबंदीनंतर सध्याची परिस्थिती पाहता घरेलू कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मदतीची गरज आहे. शासन निर्णय जाहीर होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. तरीही आजतागायत ही मदत घरेलू कामगारांना मिळालेली नाही. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या घरेलू मोलकरीण कामगारांनी भांडी घासून जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, प्रमिला रोकडे, उषा बोरुडे, रेखा पाटेकर, अग्नीश अल्हाट, सुनंदा भिंगारदिवे, विमल मिरपगार, वंदना भिंगारदिवे, राजश्री बनकर, सविता बनकर, लता बनकर आदींसह घरेलू मोलकरीण कामगार सहभागी झाल्या होत्या. शासनाने जाहीर केलेली मदत मिळत नसल्याने घरेलू कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मदत मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे. मात्र, घरेलू कामगार महिला अशिक्षित व आर्थिक दुर्बल घटक असल्याने त्यांना कामावर सुट्टी टाकून सायबर कॅफेमध्ये जाऊन खर्च करुन ऑनलाईन अर्ज भरणे अशक्य आहे. सर्व माहिती सदर कार्यालयाकडे जमा असताना कार्यालयानेच घरेलू कामगारांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज आहे. यामुळे घरेलू कामगारांचे वेळ व पैसा वाचणार असल्याचे आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS