नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सर्व देशांनी आपापल्या नागरिकांना परत आणण्याची मोहिम सुरु केली. भारतानेही आपले नागरिक मायदेशी प
नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सर्व देशांनी आपापल्या नागरिकांना परत आणण्याची मोहिम सुरु केली. भारतानेही आपले नागरिक मायदेशी परतावेत म्हणून प्रयत्न सुरु केले. भारतीय वायुदलाच्या आणि एअर इंडियाच्या विमानाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास अडीचशे भारतीय दिल्लीत परतले आहेत. भारतीय वायुदलाच्या सी-१७ विमानाने आज सकाळी १६८ भारतीय वायुदलाच्या हिंडन बेसवर दाखल झाले. तर त्यापूर्वी एअर इंडियाच्या विमानातून ८७ भारतीय नवी दिल्लीत पोहोचले. भारतीय नागरिक सुखरुपपणे एयर इंडियाच्या विमानात बसताच त्यांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या कामामध्ये ताजिकिस्तानमधील भारतीय दूतावास महत्वाची भूमिका बजावत आहे.
COMMENTS