कष्टकर्‍यांना त्यांचे हक्कांचे घर मिळवून देऊ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कष्टकर्‍यांना त्यांचे हक्कांचे घर मिळवून देऊ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्‍वासन चाळीतील कष्टकर्‍यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यमुंबई :मुंबई शहर उभारणीमध्ये कष्टकर्‍यांचे मोठे योगदान आहे. अने

शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषि संकुल असावे – मुख्यमंत्री
राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्‍वासन चाळीतील कष्टकर्‍यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य
मुंबई :मुंबई शहर उभारणीमध्ये कष्टकर्‍यांचे मोठे योगदान आहे. अनेक क्रांतीकारी चळवळी तसेच मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकर्‍यांचा मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे. आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही. त्यामुळे कष्टकर्‍यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकाम शुभारंभांच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिलं. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णनच केलं आहे. अनेक क्रांतिकारी चळवळी तसेच आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकर्‍यांचा मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे .आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही.संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्ये होते. या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.येथील ज्या जांबोरी मैदानाने क्रांतीच्या ठिणग्याना जन्माला घातले आहे, त्या ठिकाणीच आज हा रोमहर्षक असा क्षण घडतोय, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते ’चाळींतले टॉवर’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली : शरद पवार
राज्यावर कोरोना, पुराचे संकट यासह अनेक संकटाची मालिका सुरू होती. मात्र या संकट काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत दाखवली, असे कौतुक राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. बीडीडी चाळीचा सगळा परिसर महाराष्ट्राच्या ऐक्याचा आणि सांस्कृतिक ठसा व्यक्त करणारा आहे. येथे कोकणातील, घाटावरचे लोक राहतात, या दोन्ही लोकांना एकसंध करण्याचे काम या परिसरात केले जात आहे, याचा मला आनंद आहे. या चाळींमध्ये काही बदल केले पाहिजेत. अधिक सुविधा दिल्या पाहिजेत. मालकी हक्क दिला पाहिजे. याहीपेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्यामुळे हे या ठिकाणी होऊ शकले आहे, असे कौतुकोद्गार शरद पवार यांनी यावेळी काढले.

एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही; ठाकरेंचा इशारा
भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केले की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

COMMENTS