भातकुडगाव फाटा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे निर्मलाताई काकडे आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव येथे विद्यार्थी विकास मंडळांतर्गत १० जानेवारी रोजी एकदिवसीय ‘सर्जनशील लेखन आणि अभिव्यक्ती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. अमोल आगासे(एम.आय.टी. युनिव्हर्सिटी,पुणे) यांनी ‘भावनेतून अभिव्यक्तीकडे: प्रभावी काव्यलेखन कला’ या विषयावर मार्गदर्शन केले. “कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ती हृदयातील भावनांची अभिव्यक्ती असते,” हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी ‘सर्जनशील लेखन’ या विषयावर बोलताना लेखनातील तांत्रिक बाजू आणि भाषेचा प्रभावी वापर यावर प्रकाश टाकला. लेखन,पटकथा लेखन, संवाद व अभिव्यक्ती यातील सूक्ष्म छटा उलगडून दाखवल्या. सहा. प्रा. संतोष निजवे यांनी ‘वाचन: सर्जनशील लेखनाचा पाया’ या विषयावर बोलताना, “चांगला लेखक होण्यापूर्वी एक चांगला वाचक होणे अनिवार्य आहे,” असे मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित डॉ. सोपान नवथर यांनीही आपल्या कवितेच्या माध्यमातून सर्जनशीलतेचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुकळे पी.ए. म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अभिव्यक्त होण्याची साधने बदलली असली, तरी साहित्यातील मूळ गाभा आणि सर्जनशीलता टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील उपजत कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळावे सातत्यपूर्ण वाचन आणि निरीक्षणातूनच उत्तम साहित्य निर्माण होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद गायके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निकिता बोरुडे व प्रा. सचिन राठोड यांनी केले, तर प्रा. अमोल खोसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भातकुडगाव फाटा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे निर्मलाताई काकडे आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव येथे विद्यार्थी विकास मंडळांतर्गत १० जानेवारी रोजी एकदिवसीय ‘सर्जनशील लेखन आणि अभिव्यक्ती’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. अमोल आगासे(एम.आय.टी. युनिव्हर्सिटी,पुणे) यांनी ‘भावनेतून अभिव्यक्तीकडे: प्रभावी काव्यलेखन कला’ या विषयावर मार्गदर्शन केले.
“कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ती हृदयातील भावनांची अभिव्यक्ती असते,” हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी ‘सर्जनशील लेखन’ या विषयावर बोलताना लेखनातील तांत्रिक बाजू आणि भाषेचा प्रभावी वापर यावर प्रकाश टाकला. लेखन,पटकथा लेखन, संवाद व अभिव्यक्ती यातील सूक्ष्म छटा उलगडून दाखवल्या. सहा. प्रा. संतोष निजवे यांनी ‘वाचन: सर्जनशील लेखनाचा पाया’ या विषयावर बोलताना, “चांगला लेखक होण्यापूर्वी एक चांगला वाचक होणे अनिवार्य आहे,” असे मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित डॉ. सोपान नवथर यांनीही आपल्या कवितेच्या माध्यमातून सर्जनशीलतेचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुकळे पी.ए. म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अभिव्यक्त होण्याची साधने बदलली असली, तरी साहित्यातील मूळ गाभा आणि सर्जनशीलता टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील उपजत कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळावे सातत्यपूर्ण वाचन आणि निरीक्षणातूनच उत्तम साहित्य निर्माण होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद गायके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निकिता बोरुडे व प्रा. सचिन राठोड यांनी केले, तर प्रा. अमोल खोसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS