कल्याण महापालिका क्षेत्रात प्रथमच कोरोनाबळी नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण महापालिका क्षेत्रात प्रथमच कोरोनाबळी नाही

मुंबईत मागील काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या थोडी वाढली आहे. शुक्रवारी 758 रुग्णांची नोंद करण्यात आली.

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा
कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोपरगाव तालुका जिल्ह्यात अव्वल

कल्याण /प्रतिनिधी: मुंबईत मागील काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या थोडी वाढली आहे. शुक्रवारी 758 रुग्णांची नोंद करण्यात आली. 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 7.2 लाखांवर पोहोचली आहे, तर 14 हजार 860 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत काल कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. 12 मार्चनंतर पहिल्यांदाच कल्याण महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. 

    राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. राज्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत नोंदणी गेली, तर मृत्युदरातही घट होत आहे. शुक्रवारी नऊ हजार 798 कोरोना बाधित आढळले. 198 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची 59.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर आत्तापर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण एक लाख 16 हजार 674 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या चाचणीचे प्रमाण वाढवले आहे. कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता आल्याने नागरिक सार्वजनिक ठिकाणी येत आहेत. त्यामुळे मुंबई शहरात रुग्णसंख्या वाढू शकते. शुक्रवारी 30 हजार 447 कोरोना चाचण्या केल्या गेल्या. महापालिकेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून पुढच्या आठवड्याभरात चाचण्यांवर अधिक भर देण्यात येईल,अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 27 एप्रिलला निर्बंध जारी करण्याआधी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबई शहरात प्रतिदिन 45 हजार चाचण्या करण्याची महापालिकेची योजना असल्याचे म्हटले होते. रुग्णदुपटीची कालावधी 734 दिवसांवर पोहोचला आहे आणि आठवड्याचा दर 0.09% इतका झाला आहे. सलग दुसर्‍या दिवशी कल्याणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आहे. 78 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. 98 दिवसानंतर पहिल्यांदाच एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

COMMENTS