कर्जत/प्रतिनिधी :कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्राम
कर्जत/प्रतिनिधी :कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवक यांच्यासाठी शारदानगर (बारामती) येथे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. गावांमध्ये विविध योजना राबविण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरले आहे.
रोजगार हमी योजनेचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार, पर्यावरण तज्ज्ञ रामकृष्ण जगताप, महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास जमदाडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, श्री. पोळ, वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम, गणेश शिंदे, अभिजित बनकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.समारोपात आ. रोहित पवार यांनी प्रशिक्षण वर्गाचे महत्त्व विशद केले. कर्जत व जामखेड तालुक्यातील गावांच्या विकासासाठी या प्रशिक्षण वर्गाचा फायदा होणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. समारोपात संस्थेच्या संचालिका सुनंदाताई पवार, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले.
COMMENTS