कर्जत- जामखेडमधील लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात.. खा. सुजय विखे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत- जामखेडमधील लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात.. खा. सुजय विखे

कर्जत : प्रतिनिधी कर्जत- जामखेडमधील व्यक्तिस्वातंत्र्य काढून घेण्याचा सध्या प्रयत्न केला जात आहे. पोलीस, तहसील अशा यंत्रणांच्या मार्फत लोकांवर दबा

खा. डॉ. विखेंनी दिली…शहर भाजपला चपराक
स्व. दिलीप गांधी यांनी अर्बनच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला : खा.सुजय विखे
आमिषे दाखवून मतदारांना भुलवायचे आणि निवडणूक जिंकायची !

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत- जामखेडमधील व्यक्तिस्वातंत्र्य काढून घेण्याचा सध्या प्रयत्न केला जात आहे. पोलीस, तहसील अशा यंत्रणांच्या मार्फत लोकांवर दबाव टाकून लोकांचा आवाज बंद करण्याचे काम केले जात आहे. जर कर्जत तालुक्यातील लोकांचे व्यक्तिस्वातंत्र्य टिकवायचे असेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर प्रा. राम शिंदे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे विचार खा. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

कर्जतमधील बाजारतळ येथे प्रा. राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

यावेळी अरुण मुंढे, दादासाहेब सोनमाळी, सचिन पोटरे, काकासाहेब धांडे, अनिल गदादे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमादरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. कार्यकर्त्यांनी जल्लोषात घोषणाबाजी केली. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कर्जतकर उपस्थित होते.

COMMENTS