कर्जतमधील अंबालिका शुगरवर आयकर विभागाचा छापा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमधील अंबालिका शुगरवर आयकर विभागाचा छापा

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील श्री अंबालिका शुगर या खाजगी साखर कारखान्यावर केंद्रीय तपास पथकाने गुरुवारी सकाळपासून चौक

नगरला बाॅम्ब स्फोटात दोन जखमी
बसअभावी विद्यार्थ्यांना बघावी लागते तासनतास वाट
हद्दपार असताना शहरात फिरणार्‍या एकास पकडले

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील श्री अंबालिका शुगर या खाजगी साखर कारखान्यावर केंद्रीय तपास पथकाने गुरुवारी सकाळपासून चौकशी सुरू केली आहे. सकाळी सहा वाजेपासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या पथकाकडून कारखान्याचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. या भागात केंद्रीय सुरक्षा दलाचे पथक तैनात करण्यात आलेले आहे.

या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. पथकाच्या चार ते पाच चारचाकी गाड्या आल्या. या पथकाकडून काही कर्मचाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. आयकर विभागाकडून ही धाड टाकण्यात आली आहे. येथे अंबालिका शुगरचे २ प्लांट आहेत. या धाडीमध्ये नेमकी काय कारवाई केली जाते ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

कारखाना परिसरात शुकशुकाट असून यावर बोलायला कोणी तयार नाही. आयकर विभाग यापैकी एका विभागाकडून ही चौकशी सुरु आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कालच्या बारामती दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. 

COMMENTS