करंजीत सुरू होणार घरोघरी आरोग्य तपासणी- उपसरपंच आगवन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

करंजीत सुरू होणार घरोघरी आरोग्य तपासणी- उपसरपंच आगवन

राज्यभरासह कोपरगाव तालुक्यात कोरोनाने थैमान घातला असून दिवसेंदिवस आकडेवारी वाढत असतांना नातेवाइकांची देखील कोरोना बधितांच्या उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन, व आवश्यक ते गोळ्या औषधासाठी  वणवण करावी लागत असताना तालुक्यातील मृत्यू दर देखील दररोज वाढत आहे.ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

साई गाव पालखी सोहळ्यासाठी वाहनांची नोंद करण्याचे आवाहन
कोपरगावात पहाट पाडवा भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात
मारुती व्हॅनसह शितपेय चोरणारे 12 तासात मुद्देमालासह जेरंबद 

कोपरगाव शहर प्रतिनिधी- राज्यभरासह कोपरगाव तालुक्यात कोरोनाने थैमान घातला असून दिवसेंदिवस आकडेवारी वाढत असतांना नातेवाइकांची देखील कोरोना बधितांच्या उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन, व आवश्यक ते गोळ्या औषधासाठी  वणवण करावी लागत असताना तालुक्यातील मृत्यू दर देखील दररोज वाढत आहे.ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
 याच अनुषंगाने घराघरातील संशयित रुग्ण शोधण्यासाठी तालुक्यातील करंजी गावातील व वस्तीवरील राहणाऱ्या प्रत्येक कुटूंबातील सदस्याचे गावातील आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने घरोघर जाऊन आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच रविंद्र आगवन यांनी दिली आहे.
  यासाठी आरोग्य सेविकांना तपासणीसाठी आवश्यक  असलेले प्लस ऑक्सिमिटर व थर्मल स्क्रिनिंग प्रत्येकी ५ नग ग्रामपंचायतीच्या वतीने करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आले असून याचा वापर करत गुरुवार दि २९ एप्रिल २०२१ पासून घरोघरी जाऊन या सेविका मार्फत आरोग्य तपासणी केली जाणार असून या मोहिमेस सर्वांनी सहकार्य करत आपले गाव कोरोना मुक्त करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे  तसेच काही लक्षण जाणवत असल्यास आपली कोरोना चाचणी करून घेत वेळीच उपचार करून घ्यावे असे आवाहन उपसरपंच आगवन यांनी केले आहे.
 यावेळी ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब गुंड, आरोग्य सेविका हर्षली परदेशी, आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका तसेच शासनाच्या वतीने नेमून दिलेले प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS