कचर्‍यावर प्रक्रिया न करताच कोट्यवधींची बिले ; खा. सुळे यांचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कचर्‍यावर प्रक्रिया न करताच कोट्यवधींची बिले ; खा. सुळे यांचा आरोप

रामटेकडी येथे महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये लाखो टन कचरा पडून असून त्यावर कुठलीही प्रक्रिया न करता कोट्यवधींची बिले काढण्यात आली आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

वंचित घटकांना मदत करणे ही काळाची गरज
एमए बीएड धारकांना मानसेवी शिक्षक होण्याची संधी;लाभ घ्यावा – एस.एम.युसूफ़
खा. विखेंना भोवणार अखेर ते इंजेक्शन?…

पुणे/प्रतिनिधीः रामटेकडी येथे महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये लाखो टन कचरा पडून असून त्यावर कुठलीही प्रक्रिया न करता कोट्यवधींची बिले काढण्यात आली आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. महापालिकेचा रामटेकडी कचरा डेपो हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असून त्यात सत्ताधारी भाजपचा हात आहे. या गैरव्यवहाराची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. 

सुळे यांनी आज सकाळी रामटेकडी व उरळीदेवाची येथील कचरा प्रकल्पांची पाहणी केली. या वेळी आमदार चेतन तुपे, आमदार संजय जगताप, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक आनंद आळकुंटे, योगेश ससाणे, वैशाली बनकर,नीलेश मगर आदी उपस्थित होते. रामटेकडी येथील महापालिकेच्या रॉकेम प्रकल्पा शेजारच्या तेरा एकर जागेमध्ये पुणे बायोमायनिंग नावाने कचरा प्रकल्प उभा राहिला आहे. हा प्रकल्प सुरू होत असताना भाजप वगळता सर्व पक्षाचे नगरसेवक व तत्कालीन खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, माजी आमदार महादेव बाबर यांनी आंदोलन करून विरोध केला होता; मात्र महापालिकेतील बहुमताच्या जोरावर हा कचरा डेपो उभारण्यात आला. येथील कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे हडपसर, ससाणेनगर, सयदनगर व काळेपडळ या परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. येथील जलस्रोत दूषित झाले आहेत. तसेच, ससाणेनगर येथे खासगी शाळा असल्याने येथील हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे यांच्यासमवेत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली होती. तेव्हा येथील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. येथील डेपोमध्ये केवळ रोजच्या रोज कचरा टाकला जात आहे. त्यामुळे इथे कचर्‍याचे डोंगर उभे राहिले आहेत. कचर्‍यावर प्रक्रिया न करताच ती केल्याची बिले काढली जात आहेत. या माध्यमातून पुणेकरांच्या पैशाची लूट केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे

COMMENTS