औंध येथे पोलीस कर्मचार्‍यासह पोलीस उपनिरीक्षकाचा पती पन्नास हजाराची लाच घेताना अटकेत; कारवाईने खटाव तालुक्यात खळबळ

Homeमहाराष्ट्रसातारा

औंध येथे पोलीस कर्मचार्‍यासह पोलीस उपनिरीक्षकाचा पती पन्नास हजाराची लाच घेताना अटकेत; कारवाईने खटाव तालुक्यात खळबळ

खटाव तालुक्यातील औंध येथे सोमवारी दुपारी लाचलुचपत विभागाने सापळा लावून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना औंध पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल व महिला पोलीस उपनिरीक्षकांचा पती या दोघांना अटक करण्यात आली.

विधानसभेसाठी रिपाइंने मागितल्या 12 जागा
आरटीईसाठी शाळांना नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ
पोलिस भरतीचा पेपर फुटल्याची अफवा पसरविणार्‍यावर गुन्हा

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील औंध येथे सोमवारी दुपारी लाचलुचपत विभागाने सापळा लावून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना औंध पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल व महिला पोलीस उपनिरीक्षकांचा पती या दोघांना अटक करण्यात आली. खटाव तालुक्यातील ही तीन दिवसातील दुसरी घटना असून या कारवाईने पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे भावाविरुध्द औंध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रारदारांना या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत दादासो शिंदे (वय 34) व सुशांत सुरेश वरुडे (वय 35) या दोघांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

यामध्ये तडजोडी अंती सुशांत सुरेश वरुडे यांना औंध येथील घाटमाथ्यानजीक 50 हजार रुपयांची लाच संबंधित तक्रारदरकडून घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संशयित आरोपीच्या आपण पकडलो गेलो आहे. हे लक्षात येताच त्याने तेथून धूम ठोकली. परंतू औंधजवळ थरारक पाठलाग करून संबंधित पथकाने स्वीकारलेल्या रकमेसह वरुडे यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत दादासो शिंदे याच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम स्विकारली असल्याचे सांगितले. 

पोलीस निरीक्षक अविनाश जगताप यांनी शहानिशा करून चंद्रकांत शिंदे व सुशांत वरुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुशांत वरुडे औंध पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे हिचा पती असल्याने एकच खळबळ उडाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, अविनाश जगताप,

उपनिरीक्षक आनंदराव सपकाळ, काटवटे हवालदार संजय साळुंखे, पोलीस नाईक संजय अडसूळ, विनोद राजे, प्रशांत ताटे, विशाल खरात, मारुती अडागळे, संभाजी काटकर, निलेश येवले, तुषार भोसले, निलेश वायदंडे, शितल सपकाळ यांनी ही कारवाईमध्ये सहभाग घेतला.

COMMENTS