ओबीसींचे हक्क मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार – ना.विजय वडेट्टीवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसींचे हक्क मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार – ना.विजय वडेट्टीवार

नगर -  राज्यात कोरोना आणि पुरपरिस्थितीमुळे जनतेला तातडीने मदत पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे. बाधितांना मदतीचा हात देऊन त्य

Ahmednagar : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवा… बैलांसह शेतकरी उतरले रस्त्यावर I LOK News 24
पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; आमदार निलेश लंकेकडे रोख
शालेय साहित्याचे वाटप

नगर – 

राज्यात कोरोना आणि पुरपरिस्थितीमुळे जनतेला तातडीने मदत पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे. बाधितांना मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. ओबीसी प्रश्नांसंदर्भातही वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत होत आहे. 

ओबीसींना जोपर्यंत त्यांचे हक्क मिळणार नाही, तो पर्यंत हा लढा असाच सुरु राहील. राज्य सरकार ओबीसींच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नगरमध्ये ओबीसी संघटनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने या लढ्यास यशही येत आहे. प्रभा पॅलेसचे संचालक नेहमीच सामाजिक जाणिवेतून काम करतात ही चांगली काम बाब आहे. त्यांची सहकार्याची भुमिका कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केले.

राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार नगरमध्ये प्रभा पॅलेस येथे आले असता त्यांचे स्वागत संचालक विष्णू फुलसौंदर व अवधुत फुलसौंदर यांनी केले. याप्रसंगी विक्रम राठोड, अमोल जाधव, बाळासाहेब भुजबळ, डॉ.सुदर्शन गोरे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी विष्णू फुलसौंदर यांनी नक्षत्र ग्रुप, प्रभा पॅलेसच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.  कोरोना काळातही कोविड सेंटर सुरु करुन रुग्णांची सोय केली होती, असे सांगून व्यवसायक करतांना सामाजिकतेचे भान ठेवून गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. ना.विजय वडेट्टीवार यांनी सुरु केलेल्या ओबीसींच्या लढात आमचेही नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले. शेवटी अवधुत फुलसौंदर यांनी आभार मानले.

COMMENTS