ऑक्‍सिजनच्या मागणीत पुन्हा वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑक्‍सिजनच्या मागणीत पुन्हा वाढ

पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑक्‍सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
वारणा नदीच्या पुलावरून खासगी बस कोसळली
सिगरेट पिण्यास मनाई केल्याने हॉटेलमध्ये चाकू हल्ला.

पुणे : पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑक्‍सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सध्या पुणे जिल्ह्याला 310.46 मेट्रिक टन ऑक्‍सिजनची गरज भासत आहे. दरम्यान, ऑक्‍सिजनचे उत्पादन व पुरवठा व्यवस्थित होत असल्याने जिल्ह्यात ऑक्‍सिजनची कमतरता भासत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सध्यस्थितीत 357 मेट्रिक टन ऑक्‍सिजनचा साठा उपलब्ध आहे. जानेवारीत करोना बाधितांची संख्या कमी झाल्याने ऑक्‍सिजनच्या मागणीत घट झाली होती. आता मात्र जिल्ह्यात दररोज 10 हजारांपेक्षा अधिक नवे करोनाचे रुग्ण आढळत आहे. यामुळे ऑक्‍सिजनची मागणी तब्बल 359 टक्‍के इतकी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात 67.5 मेट्रिक टन ऑक्‍सिजनची गरज भासत होती. आता ही मागणी 310.46 मेट्रिक टनांवर गेली आहे. जिल्ह्यात ऑक्‍सिजनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधून पूर्ण क्षमतेने उत्पादन होत आहे. एकूण उत्पादित 80 टकके ऑक्‍सिजनचा वापर हा वैद्यकीय कारणासाठी तर 20 टक्‍के वापर हा औद्योगिक कारणासाठी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. रुग्णालयांना अखंडपणे ऑक्‍सिजनचा पुरवठा होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

COMMENTS