एस टी कामगारांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल- नामदार शंकरराव गडाख

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी कामगारांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल- नामदार शंकरराव गडाख

एस टी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नेवासा तालुका प्रवाशी संघटनेच्या वतीने नामदार शंकरराव गडाख यांना निवेदन देण्यात आले.राज्य सरकार एस टी कामगारा

चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक : उपमुख्यमंत्री फडणवीस
बॉलीवूड अभिनेत्री अर्शिन मेहता सोबत दिलखुलास संवाद l Bollywood Actress Arshin Mehta l पहा LokNews24
मंत्री असतांना एमआयडीसीचा प्रश्‍न का सोडवला नाही

एस टी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात नेवासा तालुका प्रवाशी संघटनेच्या वतीने नामदार शंकरराव गडाख यांना निवेदन देण्यात आले.राज्य सरकार एस टी कामगारांच्या मुख्य मागणीबाबत विचाराधीन असून एस टी कामगारांच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतांना व्यक्त केला.

एस टी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी एस टी कामगारांचे राज्यभर संपाद्वारे आंदोलन सुरू असून नेवासा येथे ही एस टी कामगारांनी डेपोच्या गेट समोर संप पुकारला असून तालुक्यातील अनेक गावातील सरपंच यांनी भेटी देऊन या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे 

नेवासा तालुका प्रवाशी संघटनेच्या वतीने देखील आगारामध्ये जाऊन संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके पाटील व सचिव पत्रकार सुधीर चव्हाण यांनी भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता.याआधी अनेक पक्ष संघटनांनी एस टी कामगारांच्या संपाला पाठिंबा जाहीर करून त्यांच्या आंदोलनाला पाठबळ दिले आहे.

एस टी कामगारांच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने प्रवाशी संघटनेच्या शिष्टमंडळाने नामदार गडाख यांची भेट घेऊन एस टी कामगारांच्या मागणीच्या संदर्भात आपण लक्ष घालावे अशी मागणी करत सोनई येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन  प्रवाशी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रवाशी संघटनेचे मार्गदर्शक भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब मारकळी,विष्णूभाऊ उंदरे,तन्वीर इमानदार,

नितीन मिरपगार उपस्थित होते. सरकारचा प्रतिनिधी नात्याने मी देखील यामध्ये लक्ष घालेन व लवकरच तोडगा कसा निघेल यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही नामदार शंकरराव गडाख यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली.

COMMENTS