एटीएममधून पैसे काढणार्‍या टोळीचा बँक मॅनेजर म्होरक्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एटीएममधून पैसे काढणार्‍या टोळीचा बँक मॅनेजर म्होरक्या

क्लोनिंग कार्ड वापरून एटीएममधून पैसे काढणार्‍या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या हा एक बँक मॅनेजर होता.

पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
आधार सर्व्हरमधील त्रुटी दूर झाल्याने धान्य वितरण सुरळीत सुरू
मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये भीषण अपघात

मुंबई/प्रतिनिधी : क्लोनिंग कार्ड वापरून एटीएममधून पैसे काढणार्‍या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या हा एक बँक मॅनेजर होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हे तीनही आरोपी एटीएम क्लोनर आहेत, तर त्यांच्या टोळीचा म्होरक्या असलेला बँक मॅनेजर आणि आणखी एक आरोपी फरार आहे. त्या दोघांचाही शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींकडून एटीएम कार्ड, क्लोनिंग मशीनसह मोठ्या प्रमाणात इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

क्लोनिंग कार्डच्या माध्यमातून काहीजण मोबाईलच्या दुकानात मोबाईल खरेदी करीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. संबंधित माहिती मिळताच मुंबई पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी तिथून मोबाईल खरेदी करणार्‍या तीन आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 40 पेक्षा जास्त एटीएम कार्ड, 250 ब्लँक एटीएम कार्ड, क्लोनिंग मशीनसह पिन नंबर आणि डेटा जप्त केला. पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली असता या टोळीचा मुख्य सूत्रधार बंगळूरमध्ये बसलेल्या एका बँकेचा मॅनेजर आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली. बंगळूरमध्ये बसलेला त्यांचा सहकारी बँक मॅनेजर त्यांना बँकेच्या खातेदारांच्या खात्याचे तपशील आणि त्यांच्या एटीएम पिनचा डेटा पाठवायचा. त्या माहितीच्या मदतीने हे तीन आरोपी एटीएम कार्ड क्लोन करत असत आणि एटीएममधून पैसे काढत होते. ज्यांच्या खात्यातून पैसे काढले जात होते, त्यांना पैसे काढल्यानंतर माहीत पडत होते. विशेष म्हणजे बँक मॅनेजर एटीएम क्लोनिंग करणार्‍या आरोपींना एकूण काढलेल्या पैशांच्या 15 टक्के कमिशन देत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आता या प्रकरणातील फरार बँक मॅनेजर आणि आणखी एका आरोपीचा शोध घेत आहेत. यासह आतापर्यंत किती लोकांच्या खात्यातून संबंधित टोळीने पैसे काढले आहेत, याचाही तपास पोलिस करत आहेत.

COMMENTS