भांडुप पूर्व द्रुतगती मार्गावर एका रिक्षाचालकाने 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . ठाणे मध्ये राहणाऱ्या चाळीस वर्ष मह
भांडुप पूर्व द्रुतगती मार्गावर एका रिक्षाचालकाने 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . ठाणे मध्ये राहणाऱ्या चाळीस वर्ष महिलेने काही दिवसांपूर्वी रिक्षामधून प्रवास करताना तिच्या नातेवाईकांची मोबाईल वरून ती नोकरीच्या शोधात असल्या संदर्भात संभाषण केलं होतं नेमकं हेच संभाषण रिक्षाचालकाने ऐकलं आणि त्याने तिला नोकरी देण्याचा आमिष देत तिचा मोबाईल नंबर घेतला यानंतर शनिवारी या रिक्षाचालकाने संबंधित महिलेला फोन करून तिला नोकरीला लावण्यासाठी एका इसमाची भेट घालायची असल्याचं आमिष दाखवलं आणि तो त्या महिलेला भांडुप पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या कांदळ वनात दुपारच्या वेळी घेऊन गेला त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला आणि जर कोणाला याची कल्पना दिली तर जिवे ठार मारण्याची धमकी देत त्याने या महिलेला पुन्हा ठाण्यात नेऊन सोडलं यावेळी त्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील हिसकावून घेतलं आणि त्या ठिकाणाहून तो फरार झाला पीडित महिलेने वागळे पोलीस स्टेशन गाठून याची माहिती दिली
COMMENTS