Homeताज्या बातम्या

एका कुटुंबाने ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या पतीला घेरलं.

शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा येथील शिवीगाळ आणि झटापटीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. रायमोहा येथील ग्रामपंचायतकडून सध्या अतिक्रमण काढण्याचे

अपघाताची फिर्याद न घेतल्याने शेवगाव एसटी आगार बेमुदत बंद
पवार विरुद्ध पवार संघर्ष शिगेला
सोन्या चांदीच्या दरात घसरण

शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा येथील शिवीगाळ आणि झटापटीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. रायमोहा येथील ग्रामपंचायतकडून सध्या अतिक्रमण काढण्याचे कार्य सुरु आहे. त्यात अतिक्रमण का काढले म्हणून ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेच्या पतीला एका कुटुंबाने धारेवर धरले. एवढंच नाही तर महिला सदस्याच्या पतीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आली.या अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. ही घटना तीन दिवसांपूर्वीघडली  याप्रकरणी रायमोहा पोलीस चौकीत याची नोंद झाली असून पाटोदा पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS