एकाच दिवशी 2237 ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघड ; महावितरणकडून वीजचोरांना दणका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकाच दिवशी 2237 ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघड ; महावितरणकडून वीजचोरांना दणका

सातारा / प्रतिनिधी : गेल्या ऑगस्टनंतर पुन्हा या महिन्यात एकाच दिवशी पुणे प्रादेशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत महावितरणने पुणे, सातारा, सांगली,

डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीला एका तासात केले जेरबंद l पहा LokNews24
प्रवाशांनी भरलेली बस पलटली I LOKNews24
मोठी घडामोड… शिवसेनेचे शहरप्रमुख गेले थेट शरद पवारांच्या भेटीला

सातारा / प्रतिनिधी : गेल्या ऑगस्टनंतर पुन्हा या महिन्यात एकाच दिवशी पुणे प्रादेशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत महावितरणने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत 2237 ठिकाणी वीजचोर्‍या व विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला आहे. तसेच नियमाप्रमाणे दंड व चोरीच्या वीजवापरासह सुमारे 3 कोटी 42 लाख रुपयांच्या वीजबिलांची वसुली सुरु करण्यात आली आहे. या बिलांचा भरणा न करणार्‍या वीजचोरांविरुध्द भारतीय विद्युत कायद्याचे कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे प्रादेशिक विभागात वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाई सुरु आहे. सोबतच वीजचोरांविरुध्द कठोर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार एक दिवसीय विशेष मोहीम घेण्यात येत आहे. गेल्या ऑगस्टमध्ये ही विशेष मोहीम घेण्यात आली. त्यानंतर पुन्हा 11 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता या मोहिमेला सुरवात करण्यात आली. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात एकाच वेळी शेकडो अभियंता व कर्मचार्‍यांनी विविध पथकांद्वारे वीजचोरी विरोधात कारवाई सुरु केली. यामध्ये दिवसभरात पाचही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींच्या 18 हजार 37 वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2237 ठिकाणी वीजचोर्‍या व अनधिकृत वीजवापर आढळून आला. या मोहिमेत सुमारे 20 लाख 66 हजार युनिटची वीजचोरी झाल्याचे प्राथमिक तपासणी दिसून आल्याने त्याची वसुली करण्यासाठी सुमारे 3 कोटी 18 लाख 25 हजार रुपयांचे वीजबिल संबंधीत ग्राहकांना देण्यात येत आहेत. नियमाप्रमाणे दंड व वीजचोरीचे बिल न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात 1066 ठिकाणी 1 कोटी 95 लाख 57 हजार, सातारा जिल्हा 141 ठिकाणी 11 लाख 53 हजार, सोलापूर जिल्हा 647 ठिकाणी 62 लाख 60 हजार, कोल्हापूर जिल्हा 182 ठिकाणी 41 लाख 11 हजार आणि सांगली जिल्ह्यात 201 ठिकाणी 7 लाख 43 हजार रुपयांच्या वीजचोर्‍या व अनधिकृत वीजवापर आढळून आला. या विशेष मोहिमेत प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्यासह प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकारी, अभियंते व जनमित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोबतच महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी देखील वीजचोर्‍या उघड करण्यास विशेष सहकार्य केले. उघडकीस आलेल्या वीजचोर्‍या विशेषतः सधन व सुशिक्षित घरगुती, व्यावसायिकांसह कृषी ग्राहकांकडील आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीज पुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीज वापर करणार्‍या ग्राहकांविरुध्दही या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात आली.

COMMENTS