एकाच कुटुंबातील तिघे ओमान देशातील समुद्रात बेपत्ता .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकाच कुटुंबातील तिघे ओमान देशातील समुद्रात बेपत्ता .

समुद्रात वाहून गेले जत तालुक्यातील नागरिक .

सांगली प्रतिनिधी- सांगली( Sangli) जिल्ह्याच्या जत( Jat) तालुक्यातील तिघेजण ओमान(Oman) देशात समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

Ashish Shelar Live: आशिष शेलार पत्रकार परिषद Live (Video)
अकोले शहरात विविध उपक्रमांनी श्रीराम नवमी उत्साहात साजरी
माऊली दादा आणि सुदामदेव बाबा एकाच नाण्याच्या दोन बाजु-लक्ष्मण महाराज मेंगडे

सांगली प्रतिनिधी- सांगली( Sangli) जिल्ह्याच्या जत( Jat) तालुक्यातील तिघेजण ओमान(Oman) देशात समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे,(Shashikant Mhamane) त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती(Shruti) आणि सहा वर्षाचा मुलगा श्रेयस(Shreyas) हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. अद्याप समुद्रात त्यांचा शोध लागलेला नाही. मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर(Sales manager) म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका,(Sarika,) मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती आणि अन्य एक मुलगी यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने मयत शशिकांत, पत्नी, मुले आणि मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले असता हि दुर्घटना घडली .

COMMENTS