एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर, रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर, रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे मागील आठवड्याभरापासून बॉम्बे रूग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रु

खडसेंना संपविण्यासाठी ईडीची कारवाई : राज ठाकरे
खडसेंवर ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता
खडसे यांची ईडीकडून चौकशी ; राजकीय हेतूने कारवाई होत असल्याचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे मागील आठवड्याभरापासून बॉम्बे रूग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणासंदर्भात मागील अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने त्यांच्यावर कुटुंबियांच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला आहे.

COMMENTS