एकतर्फी प्रेमातून मुलीला ठेवले डांबून ; नगरच्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून मुलीला ठेवले डांबून ; नगरच्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

एकतर्फी प्रेमातून मुलीने लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून अकोला येथील मुलीला पळवून नेऊन तिला नगरला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कालवा सल्लागार समिती बैठक तातडीने व्हावी ः स्नेहलता कोल्हे
करुणा मुंडेंची 31 लाखांची झाली फसवणुक
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हा ; महावितरणचे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी- एकतर्फी प्रेमातून मुलीने लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून अकोला येथील मुलीला पळवून नेऊन तिला नगरला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नगरमधील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    याबाबतची माहिती अशी, संबंधित तरुणी पुणे येथे एका खासगी कंपनीत कॉप्युटर इंजिनियर म्हणून कामाला आहे. दि. 29 मे रोजी त्या तरुणीचे तिच्या आईसोबत मोबाईलवर बोलणे झाले व त्यात त्या तरुणीने तिचा मित्र समीर शेख अब्दुल समद याने तिला नगर येथे बोलावून लग्न करण्यासाठी आग्रह धरला असता त्या मुलीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने तीन मित्रांच्या सहाय्याने नगर येथे त्या मुलीला डांबून ठेवले तसेच त्या मुलीला त्यांनी जबरदस्त त्रासही दिला. विशेष म्हणजे या तीन जणांनी त्या मुलीचा फोटो काढून तिच्या आईच्या व्हॉट्सअपवर तो फोटो टाकला, त्यानंतर संबंधित तरुणीने आपल्या आईशी संपर्क केला असता, मी अडचणीत आहे असे फक्त सांगितल्यावर तिच्या हातातून फोन काढून घेऊन तो बंद केला. यावरून आपली मुलगी संकटात असून तिचे अपहरण केल्याचे समजताच त्या तरुणीच्या आईने नगर तोफखाना पोलिसांकडे धाव घेतली.

दोघांना घेतले ताब्यात

तोफखाना पोलिसांनी त्या तरुणीच्या आईने दिलेल्या यादीवरून समीर शेख अब्दुल समद याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान सोळके करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी या घटनेचा तपास करून संबंधित मुलगा व मुलगी यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS