एकच व्यक्ती पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह ; कोरोना तपासणीचा सावळा गोंधळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकच व्यक्ती पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह ; कोरोना तपासणीचा सावळा गोंधळ

एकच व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना तपासणीत निगेटिव्ह, तर खासगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत पॉझिटिव्ह ठरला.

अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया
पोलिस तपास थंडावला…‘विद्युत’च्या अहवालाची प्रतीक्षा
भारताची वाटचाल महासत्तेकडे दिमाखात होत आहे- नानासाहेब जाधव

अहमदनगर/प्रतिनिधी- एकच व्यक्ती जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना तपासणीत निगेटिव्ह, तर खासगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत पॉझिटिव्ह ठरला. कोरोना तपासणीच्या या सावळ्या गोंधळाबाबत विश्‍व मानवाधिकार परिषदेच्यावतीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून, तसे निवेदन अप्पर जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. 

शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना, एकाच दिवशी एका व्यक्तीने केलेल्या कोरोना चाचणीचा जिल्हा रुग्णालयातील अहवाल निगेटिव्ह, तर खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने अशा दोन प्रकारच्या अहवालाबाबत संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात चौकशी करुन चुकीचा अहवाल देणार्‍या लॅबचे रजिस्ट्रेशन रद्द करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन विश्‍व मानवाधिकार परिषदेच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी विश्‍व मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव सय्यद शफीबाबा, जिल्हाध्यक्ष अज्जू शेख, अल्ताफ शेख, उपजिल्हाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव शब्बीर शेख, सचिव मुजम्मिल पठाण, ललित कांबळे, शादाब कुरेशी, ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, वाहिद शेख आदी उपस्थित होते.

याबाबतची माहिती अशी की, कोठी येथील चंद्रकांत उजागरे यांनी अस्वस्थता जाणवत असल्याने शंकेचे निरसन करण्यासाठी सावेडी येथील भूमी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये 18 मार्चला कोरोनाची तपासणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत अधिक खात्री करण्यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयात त्याच दिवशी कोरोनाची तपासणी करुन घेतली. मात्र, त्याचा अहवाल दोन दिवसांनी निगेटिव्ह आल्याने ते चक्रावले. एकाच दिवशी एका व्यक्तीचे कोरोना तपासणीचे निगेटिव्ह व पॉझिटिव्ह अशा दोन प्रकारचे अहवाल आले आहे. तसेच एकावेळी एकाच माणसाचे दोन वेगवेगळे कोरोना तपासणी अहवाल येत असल्याने कोणत्या अहवालावर विश्‍वास ठेवायचा, हा प्रश्‍न पडला आहे. एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढणार आहे. तर तो व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असून, पॉझिटिव्ह दाखविल्यास उपचारादरम्यान काही कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? अशा तपासणी अहवालामुळे प्रश्‍न व शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी चौकशी करुन चुकीचा अहवाल देणार्‍या लॅबचे रजिस्ट्रेशन रद्द करुन दोषींवर 420चे गुन्हे दाखल करण्याची मागणी विश्‍व मानवाधिकार परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.

COMMENTS