Homeताज्या बातम्या

एअर इंडियाच्या विमानाला धडकला पक्षी

रायपूर ः छत्तीसगड राज्यातील रायपूर विमानतळावर मंगळवारी मोठा अपघात टळला. विमानाला पक्षी धडकल्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये मोठया प्रमाणावर घबराहट निर

चिनी तैपईला नमवून व्हिएतनामचा फिफा विश्‍वचषक स्पर्धेत प्रवेश
नगरच्या उपनगरांची भुयारी गटार योजना अडकली वादात
कोपरगाव विधानसभेची निवडणूक होणार रंगतदार


रायपूर ः छत्तीसगड राज्यातील रायपूर विमानतळावर मंगळवारी मोठा अपघात टळला. विमानाला पक्षी धडकल्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये मोठया प्रमाणावर घबराहट निर्माण झाली होती. मात्र वैमानिकांनी मोठया हुशारीने ते विमान पुन्हा धावपट्टीवर उतरवल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.
केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुका सिंह देखील या विमानात होते, असे सांगितले जात आहे. ही घटना धावपट्टी क्रमांक 24 वर सकाळी साडेदहा वाजता घडली. पायलटने हुशारीने विमान लँड केले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर, अभियंत्यांकडून फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाली का हे तपासण्यात आले. रायपूर विमानतळाचे संचालक राकेश रंजन सहाय यांनी सांगितले की, -खउ 469 या विमानाने 179 प्रवाशांसह रायपूर वरुन दिल्लीसाठी सकाळी उड्डाण केले होते. त्यानंतर एक पक्षी विमानाला धडकला. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. या घटनेनंतर प्रवासी उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावरील कर्मचार्‍यांनी धावपट्टीच्या तपासणीदरम्यान पक्ष्यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. एअर इंडियाचे अभियांत्रिकी कर्मचारी आणखी विमानाची तपासणी करत आहेत.

COMMENTS